ह्या ओळी कधीच्या लिहून ठेवल्या आहेत
त्यावरून फक्त थोडी धूळ झटकायची आहे,
खिडकीबाहेर तिरकं करून त्यांना नीट तपासायचे
आहे सकाळच्या निष्पाप उन्हात
तेवढं झालं की तुझे-माझे विलग अर्थ
ह्यांच ओळीत, तुझ्या-माझ्या एकमेकांना दाबू पाहणाऱ्या भाषांत
एकाचा बळी जाऊन दुसरा अडगळीत जाईपर्यंत
जिवंत तगमगणाऱ्या ह्या ओळी
ज्या कधीच्याच लिहून ठेवल्या आहेत