लोकलखाली कोणी आला
मॅसेज केला बायकोला
आज लेट
पाहिली का रे बॉडी
सफेद कपड्यात रक्ताळलेली
तेवढ्यात पुढे निघाली गाडी
चुकचुकले लोक, घड्याळे बघतात
ज्याला नाही काही खंत
ते शरीर तेवढे स्ट्रेचरात
असे मरती कोट्यानकोटी
पण रडेन फक्त माझ्यासाठी
सध्या पाहीन सिरीयल
जी काल चुकली
नोंद आहे ह्या मृत्यूची
कोणीतरी आला गाडीखाली
अशी अनेकानेक ग्रुपात
असेल नाव कलेवराला
असेल एक गोष्टही
जिने अजस्त्र गोंधळाला
रेंगाळवले काही क्षण, निरर्थक होण्याआधी