आजचे मरण उद्यावर ढकलले,
तसे
उद्याचे कलले किंचित परवावर, आणि परवाचे अंशतः तेरवावर
टीचभर
जागा झाली तिथे थोडे बूड टेकले
खोल
श्वास घेतला, त्यावर
लक्ष दिलं,
नाकपुडीत, नाकाच्या टोकाशी मंद झीणझीण
तसे कोसळले
सारे गोदाम
त्याला
नीट लावले कार्टेशिअन प्लेनमध्ये
पुढचे-मागचे, सुख-दुःख
आता
जागा बाकी तेवढी ओरिजिनपाशी, शून्य-शून्य
ही एवढीच जागा आपली.