पंधराव्या वर्षी मला हे ठाऊक होतं की
हे जग केवळ माझ्या विजयासाठी राखीव आहे
पंचवीस वर्षाचा झालो तेव्हा मी माझ्या
दिग्-पराजयाचे पांढरे निशाण शोधू लागलो होतो
पस्तिशीचा झालो तेव्हा मी होतो अनभिषिक्त चक्रवर्ती
692 स्क्वेअर फुटांचा
आता मी वाट पाहतो आहे पंचेचाळीशीची
जेव्हा
15 वर्षाच्या जगजेत्त्याला मी देऊ करेन शहाणपण
जे तो
विनम्रपणे दुर्लक्षून टाकेल