बघ्या: सर, हे वेगळं केलेलं निर्माल्य तुम्ही कुठे कंपोस्ट करता?
सर : (विद्यार्थ्याने काढलेल्या फोटोत सस्मित होत) कसं आहे, समाजात पर्यावरणाची जाणीव रुजणं महत्वाचं आहे. आम्ही मागची अनेक वर्षे हे काम करीत आहोत. आज ह्या कृत्रिम तलावावर १०००० शाडूच्या मातीचे गणपती विसर्जनाला येतात. ६ वर्षामागे, जेव्हा मी प्रोफेसर म्हणून जॉईन झालो, तेव्हा ४००० गणपती येत, सारे पी.ओ.पी. चे. हा डोळस बदल आहे. ही श्रद्धेला दिलेली दिशा आहे. शेवटी गणपती विद्येची देवता आहे. बोला, विज्ञानमूर्ती मोरया
बघ्या: असं, असं..
----
बघ्या: सर, तुम्ही गणेशोत्सव ही लोकांची स्वतंत्र अभिव्यक्ती आहे असं म्हणता आहात. म्हणजे जरा स्पष्ट कराल का? तुम्ही गणेशोत्सवाच्या आजच्या स्वरूपाबद्दल बोलताय का?
सर: हे पहा, आपण लोकशाहीचे नागरिक आहोत. मी आहे. मी मोहरम मिरवणुकांना काही म्हणत नाही. मी ३१ डिसेंबरच्या जल्लोषाला काही म्हणत नाही. कारण शेवटी प्रत्येक माणसाचा अभिव्यक्त होण्याचा मार्ग वेगळा आहे. आणि माणसांच्या ह्या वैविध्यानेच देश, समाज, मानवता संपन्न होत असते.
बघ्या: सर, आपण सध्या कुठे असता?
सर: अरे, 'जागतिकीकरण, तंत्रज्ञान आणि उत्सवप्रियता' ह्यावर एक प्रबंध वाचायला आलोय इथे हेलसिंकीला. ये कधी आलास पवईला तर.
---
बघ्या: पर्यावरणवादी हे निव्वळ खुसपटवादी आहेत असं कसं म्हणता तुम्ही?
नेते: छटपूजेला ह्यांना त्रास होत नाही चौपाटी घाण केल्याचा. गणपती तेवढा खुपतो. परंपरांची काटछाट आम्ही सहन करणार नाही. मांगल्य, श्रद्धा आहे आमची, तुम्ही ज्याला मातीची मूर्ती मानता. प्रश्न काढण्यापेक्षा उत्तर द्या अथवा गप्प बसा. लुडबुडू नका.
बघ्या: आणि ध्वनी प्रदूषण हा चिमूटभर अति-शहाण्या लोकांचा भ्रम आहे असंही तुम्ही म्हणालात?
नेते: पहाटेचे भोंगे ऐकू येत नाहीत तुम्हाला? ते डेसिबल कोण मोजतो? लक्षात घ्या, आमच्या श्रद्धेवर उठाल, तुम्हाला इथून उठवू.
बघ्या हो, हो करत उठून सूममध्ये जातो.
--
बघ्या: आचार्य, एखाद्या व्यक्तीची अंत्ययात्रा 'बाई, जरा जपून दांडा धर' गाण्यावर काढली तर गैर होईल का?
आचार्य: पाखंडी होऊन प्रश्न विचारणं सोपं आहे. धर्माचे स्वरूप सूक्ष्म आहे. लोकांच्या वरकरणी विसंगत वाटणाऱ्या वर्तनात इतिहासाची खोल परंपरा आहे. ह्या भूमीत झालेल्या तपस्वी-योग्यांनी लोकांना धर्माचे सूक्ष्म स्वरूप समजणार नाही म्हणून परंपरा निर्माण करून दिल्या आहेत. त्यात कालौघात त्रुटीआल्या तरी त्यात युगानुकूल बदल घडवणारे दार्शनिक इथे जन्माला येतातच. गुणधर्म आहे तो ह्या मातीचा. आमच्या हरद्वारच्या आश्रमात जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक हा धर्म समजून घ्यायला येतायेत. कधी तुम्हीही या..
बघ्या: आ, हा.
हरवलेल्या हिवाळ्याच्या कविता
उंबऱ्याशी आलेल्या दुःखाच्या घिरट्या आहेत शहरावर. खरंतर हा डिसेंबर आहे , जिथे आपण वर्षभराचे घाव हलक्या सुखाच्या रंगीन मृगजळात विसरू शक...
-
मागच्या वर्षी कधी वर्तमानपत्रात, कधी फेसबुकवर मी ‘हंडाभर चांदण्या’ बद्दल वाचलं होतं. मग केवळ १०० रुपये तिकिटात आपल्या शहरातील नाट...
-
तिथे जे डोंगर आहेत तिथे आपल्याला जायचं आहे, ते डोंगर, ज्यांच्या अस्तित्वाच्या रेषा दिसतायेत धुकट धुकट, तिथे. तू.सोबत चाल किंवा एकटा आपापला ...
-
अनंतचतुर्दशीला घरात बसून धातुकी कंपने अनुभवताना मी हे विचार सुरु केले. मनोरंजन किंवा closure हेच त्याचे प्रमुख उद्दिष्ट आहे, पण झालाच त...