Friday, May 25, 2007

येतील असे दिवस जेव्हा आयुष्य सुन्दर असेल
येइल असाही दिवसजेव्हा मरण्याला अर्थ असेल.
डोळ्यात दाटलेल्या प्रत्येक अश्रूची फुले होतील
अशीही असेल वेळ जेव्हा सारे दरवाजे खुले होतील.
अशीही असेल वेळ जेव्हा जगण्याची कविता झाली असेल
हे जग माझ्यात मिटले असेल अन् माझे निशाण कुठेच नसेल

हरवलेल्या हिवाळ्याच्या कविता

उंबऱ्याशी आलेल्या दुःखाच्या घिरट्या आहेत शहरावर. खरंतर हा डिसेंबर आहे , जिथे आपण वर्षभराचे घाव हलक्या सुखाच्या रंगीन मृगजळात विसरू शक...