Liu Cixin
ह्या चायनीज लेखकाच्या
तीन सायन्स फिक्शनना मिळून ‘थ्री बॉडी प्रॉब्लेम’ असं म्हटलं जातं. खरंतर ‘Remembrance
of Earth’s past’ असं
ह्या त्रयीचं ऑफिशियल नाव आहे. पहिला भाग ‘थ्री बॉडी प्रॉब्लेम’, ‘दुसरा ‘डार्क फॉरेस्ट’ आणि तिसरा ‘डेथ’स एंड’ आहे. तिन्ही भाग मिळून सुमारे पाने आहेत.
Image: Amazon.com |
लिखाणाच्या
वर्गीकरणानुसार ‘थ्री बॉडी प्रॉब्लेम’ हे ‘हार्ड सायन्स’ फिक्शन आहे. कारण ह्या त्रयीमध्ये फिजिक्सच्या मूलभूत
नियमांशी सुसंगती राखण्याचा प्रयत्न आहे. तांत्रिक चमत्कारांचा कल्पनाविस्तार अशी जी
सायन्स फिक्शनची लोकप्रिय प्रतिमा आहे त्यात ‘थ्री बॉडी प्रॉब्लेम’ बसणार नाही.
माझ्यामते ‘लॉर्ड ऑफ द रिंग्स’ च्या तोडीचं, आणि माझ्या वैयक्तिक मतानुसार
त्यापेक्षाही खरंतर वरचढ अशी ही सिरीज आहे. लेखकाने त्याच्या कथनासाठी प्रतिसृष्टी
घडवली आहे, पण ती
घडवताना त्यातल्या निसर्ग नियमांच्या सुसंगती कायम राखण्याचा प्रयत्न आहे. हे कठीण
काम आहे. ‘song of Ice
and Fire (Game of Thrones)’ ह्यांत अशी प्रतिसृष्टी
आहे. पण त्यांत अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांना कल्पनाविष्कार ह्यापलीकडे काहीच
म्हणता येणार नाही. ‘थ्री बॉडी प्रॉब्लेम’ ने विज्ञानाच्या
आत्ताच्या अवस्थेनुसार जे theoretically
घडणं
अशक्य आहे असं काहीही बनवलेलं नाही. काही ठिकाणी तर ‘थ्री बॉडी प्रॉब्लेम’ ही फिजिक्सच्या टर्म्सचा
संपर्क नसलेल्या वाचकाला अत्यंत दुर्बोध होऊ शकते.
The brilliance of the trilogy is even while being through and through consistent
to theory of physics, it has remained a human story.
Master craftsman म्हणता येईल अशा
तोडीचं लिखाण, तपशील, प्रयोग आणि रंजकता
(सस्पेन्स, back stories इत्यादी) अशा सगळ्यांत ‘थ्री बॉडी प्रॉब्लेम’ जबरी आहे. सुरुवातीला
अनेक पात्रे आणि फिजिक्सचे डायहार्ड रेफरन्स ह्यामुळे थोडा वेग कमी राहू शकतो, but it is more than worth it.
--
ह्या तिन्ही
कादंबऱ्या चायनीज आहेत. आणि लेखकाचा युनिव्हर्स-व्ह्यू हाही चायनीज
परिप्रेक्ष्याचा आहे. जसं हॉलीवूड चित्रपटांत सारी जागतिक संकटे अमेरिकन शहरांवर
येतात आणि त्यांचे तोडगेही ओतप्रोत अमेरिकन (भावनांत भिजलेला, सद्गदित असा आशावाद
अशा अर्थाने) असतात, तसं
थोडसं ‘थ्री
बॉडी प्रॉब्लेम’ चं
आहे. अर्थात ‘बहु
असोत सुंदर संपन्न कि महा, प्रिय अमुचा चीन सर्वश्रेष्ठ हा’ असं नाही. पात्रं
चायनीज आहेत, थोडी
अमेरिकन आहेत अशा अर्थाने ह्या त्रयीवर चायनीज व्ह्यू आहे. अमेरिका, युरोप आणि चीन ह्या
तिघांपलीकडे फार उल्लेख येत नाहीत. It’s interesting! ‘सूर्यमालेवर संकट’ अशा आशयाचं काही
वाचतो आहोत आणि त्यांतली lead
characters महाराष्ट्रीयन, तमिळ, बंगाली, बनारसी, कन्नड, बिहारी अशी असतील
तर कसं वाटेल असं माझ्या डोक्यांत येत होतं. 😊 अर्थात चीनचं
जागतिक महाशक्ती असणं ही आता शक्यता नाही तर वास्तव आहे. ही त्रयी चीनला ही जाणीव
येत असण्याच्या वर्षांत म्हणजे २००८ नंतरच्या काळांत लिहिली गेलेली आहे.
कादंबऱ्यांची स्केल ‘युनिव्हर्सल’ आहे. सुरुवातीचे दोन भाग हे पृथ्वी आणि
पृथ्विपलीकडचे विश्व ह्यांच्या संबंधांवर आहे. त्यांत पृथ्वीवरच्या राजकारणाचा
संदर्भ येतो. आणि लेखकाने अमेरिका, युरोप आणि आशिया (म्हणजे प्रामुख्याने चीन) अशा
मांडणीवर गोष्ट ठेवली आहे.
I think it is a confidence of materialistically dominant civilization.
--
पण विज्ञान कादंबरी असली तरी कादंबरी मूलतः
माणसांची आहे. ग्रेट नॉव्हेल्स ह्या thought experiments असतात. माणसांच्या आयुष्याचे काही parameters हलवले तर काय होईल ह्याचा कानोसा त्यांत
असतो. When we can’t have
scientific or mathematical models, we tell stories.
‘थ्री बॉडी प्रॉब्लेम’ वाचताना लेखकाने ह्या प्रयोगाला ज्या
पद्धतीने एका प्रचंड स्केलला नेलं आहे, आणि तरीही त्यांत केवळ विस्मित करणाऱ्या
तांत्रिक प्रयोगांची भरमार न करता एक सुसंगत, थरारक आणि अवाढव्य गोष्ट सांगितली आहे ते
जाणवून थक्क व्हायला होतं.
आणि हा लेखक कुठे प्रोफेसर नाही. हा एक
कम्प्युटर इंजिनीअर आहे, जो आधी
एका पॉवर प्लांटमध्ये काम करायचा. त्याचे पालक खाणीत काम करत. 😊
--
‘Three body problem’ is engrossing, enriching and philosophically thought-provoking fun!