मला ह्या कादंबरीमध्ये सर्वात जास्त काय आवडलं असेल तर रोमन भाषेत येणारे हिंदी आणि मराठी शब्द. छ्या/छे असा उच्चार असलेली इंग्लिश कादंबरी अजून कुठली आहे का? :)
आपल्याला ठीकठाक माहित असलेल्या भूगोलात घडणारी, प्रचंड रेसी (ओघवती!) आणि तरीही एकदम watertight अशी स्टोरी अशी 'मर्डर इन माहीम' आहे. पिंटो ह्यांच्या 'Em and the Big Hoom' मध्ये आहे ती शांतपणे एक एक थेंब करत आपल्याभोवती जमा होणारी उदासी ह्यांत नाही. नावांत आहे तशी ही मर्डर मिस्ट्री आहे.
कादंबरी वाचताना, विशेषतः त्यातले पात्रे जगत असलेल्या लैंगिक जीवनाचे रेफरन्स वाचताना मला सुमेध वडावाला-रिसबूड ह्यांच्या कथांची आठवण येत होती. मी ७वी-८वी मध्ये असताना (😯) दिवाळी अंक आणि एका संग्रहात त्यांच्या कथा वाचल्या होत्या. तेव्हा कदाचित त्यातले सेक्शुअल रेफरन्सच लक्षात राहिले आणि वडावाला हे आडनाव. (त्यांच्या एका कथेत बहुतेक 'सुलतान' नावाचं एक मध्यवर्ती पात्र होतं, मुंबईत हिरो बनायला आलेलं)
भारतातल्या पोलीस तपास कथा वाचताना वेगळीच मजा येते. विक्रम चंद्रा ह्यांची 'sacred games' , रीती गडेकर ह्यांची 'Families at home' ह्या दोन कादंबऱ्या आठवतात.
--
भारतात घडणारे गुन्हे, त्यातले वैविध्य (😲) आणि त्यांत असू शकणारी राजकीय-आर्थिक संबंधांची व्यामिश्रता हे पाहता गुन्हा केंद्रभूत ठेवून सांगता येणाऱ्या कथा अधिक प्रमाणात येऊ शकतात.
माणसाचे मन आणि त्यांत असू शकणाऱ्या विकृती/प्रकृती/कृती हा Netflix वर चा एक हिट विषय आहे. मध्ये मी 'Mindhunter' पाहिली. 'हनिबाल' आहे.
अनुराग कश्यपचा 'अगली' आणि विजय नंबियारचा 'शैतान' हेही दोन अव्वल सिनेमे होते.
----
रविवारची सकाळ मिसळ, कॉफी आणि कादंबरी वाचत काढणं, ह्याने आनंदी व्हावं का आपण इतके रिकामचोट आहोत ह्यानं न-आनंदी व्हावं?