Skip to main content

Posts

Showing posts from April, 2010
ए वेडे ऐक,
नाही म्हटला तरी वेड्या माणसांची बरीच गाणी आता झाली आहेत.
सापडत राहतात माहितीच्या बेटांत ती अधून-मधून...
तुला पत्र लिहू
का पोचू तुझ्यापर्यंत निमिषार्ध व्यापणारी माध्यमे घेऊन...
मी तुझे संदर्भ अलग करतो आणि अर्थात माझेही
आणि लिहित राहतो जे खरं तुलाच सांगायचं होतं...
देहभर तुझ्या दंशांच्या खुणा
आणि मनात फुटलेलं तुझ्या अस्तिवाचा वारूळ
तुझं अर्थ कळतच नाही मला,
फक्त गुरफटला जातो तुझ्या माझ्या सोबत असण्यात.
तुला-मलाही हि अशी शब्दांची चढलेली भूल,
तुझ्या देहाच्या अलवार वळणांचा मदिर कैफ
आणि जगाच्या प्रघाताना विसरलेली बेईमान रात्र..

हि देहभूल उतरेल आणि मग मी पाहीन आत्ताच्या
बेभान आवेगांकडे ते माझे नसल्यागत...
मग हे सारे प्रहर सहज मागे सोडत
मी माझ्या मुक्त मोकळेपणात....
कळेल तुला याचा अर्थ...
एकमेकात भिनत जाताना आरपारही जात असतो आपण एकमेकांच्या...
निखळ पारदर्शी होऊन गेलो एकमेकांना तर ओळख उरेल का एकमेकांची....
तुझा अर्थ उमजेल न उमजेल...
तू माझ्यातल्या आभाळाला माझ्या मुळांशी जोडणारी रेघ आहेस...
तुझ्यापेक्षाही जास्त उत्कट प्रतिमा तुझी...
तुझ्या शब्दांहून गहिरे तरंग मी माझ्या प्रतीबिम्बावर सोसलेले....

इतक्या सहज उमटू देतीयेस मला तुझ्यावर
इतकी का तूही पार गेलीयेस स्वतःच्या कोणीतरी असण्याच्या...
का कळतच नाहीये तुला कि
मी मलाच शोधतोय तुझ्यातही
तुझा संदर्भ तर कधीचाच मिटून गेलेला...
विरत जाणारे हळवे सुख. सकाळपासून हि ओळ माझ्या सोबत आहे. रिक्षात बसून येत होतो. पाठी वळून न बघता आईचा निरोप घेतला होता. खरतर ५-६ दिवसांसाठी घरापसून दूर जाणार. घर ते पण काय, स्वतचा कोंडमारच जिथे जास्त जाणवला ती जागा, पण तरीही आई अशी निरोप द्यायला बाहेर आली कि तुटत राहत. काहीतरी ठेवून चाललोय मागे असं जाणवत राहता. आईचे वाटेकडे पाहणारे डोळे जाणवत निघालो. रिक्षा तिच्या गतीने धावत होती. शहरही जागा होऊन धावायला तयार होत होतं. अर्धवट झोप, करायच्या कामांची काळजी, आणि सदैव चालू असणारे बिन लाग्याबंध्यांचे विचार याच्यामध्ये एक सुखद झुळूक जाणवली वार्याची. एक मस्त गार लहर अंगभर. खरतर तासाभरात उन्हाची तल्खली सुरु होणार, मग हा गारवा कुठला. हि येणाऱ्या पावसाची चाहूल का गेलेल्या थंडीची चुकार आठवण. मग हि ओळ आली, कोपर्यात घर कार्रोन बसली, आयुष्याचे संदर्भ आणि ज्या माणसांच्या आठवणीनी प्रत्येक वळण लक्षात ठेवला त्या सार्यांचा अर्थ ह्या ओळीतच उलगडायला लागला.
पण आता रात्र झाली. तशी प्रत्येक दिवसालाच बिलगूनच रात्र येते. पण रात्र म्हणजे दिवसाच्या जाणिवेची वाढ नाही, तिला स्वताचा असा मंथर काळोख असतो, त्या काळोखाल…
तुला विसरण्याची अटळ प्रक्रिया सुरू झालीये, बहारानंतर येणारी पानगळ. आता हे वठत चालेल्या झाडावरचे शेवटचे पक्षी. स्थित्यंतराचे भोग हे असेच, आणि म्हणून हे कळून उमजून स्वीकारलेले मौन तुझ्या माझ्यात.
पण शेवट व्हायचा, तर तो खोल असावा, थांग न येणारा. एकमेकांना कुरतडत असा एकमेकांना जखमी करून आपण आठवणींच्या मोरापिसानाही वार्यावर उधळून दिला. तुझं विचार करताना मनाचं निब्बर होणं डाचत राहता. इतके खोल व्रण सोडले मधल्या काळाने आपल्यावर. तरीही आता परत संवादाचे पूल उभे करावेत आणि येणाऱ्या वादळाची वाट पहावी इतकी उभारी राहिलेली नाही. हि शांतताच अखंड राहूदे, आणि तुझ्या आठवणीची वळलेली पानं उडून जावोत ह्या रिकाम्या होत चालेल्या अंगणातून आणि काही सुकलेली फुलं उरोत कवितांच्या पानात, विसरून गेलेली.
बराच गोंधळ आहे, आणि त्यातच स्वतःला कशावर तर केंद्रित करण्याचे निष्फळ प्रयत्न चालू आहेत. मुळात हे असं केंद्रित होणं अगदी बरोबर असं काहीतरी बिम्बवलेलाच असतं कदाचित मनावर. पण तसं असल्याने निर्णय घेणं बराच सोपं होतं असही मी शिकलो आहे आता. पण असं उगाच जगाच्या प्रश्नात स्वताची अमूर्त models बनवत राहणं ही एक वेळखाऊ गोष्ट आहे असं मला वाटतंय. अर्थात स्वप्नं चितारायची बरीच सवय असली कि मोडेल बनवणं फारसा कठीण जात नसावा. पण स्वताच्या मनातल्या अमूर्ततेला आकार देण्यासाठी इतरांनी काय काय करून ठेवलाय हेही पाहून ठेवावं लागता, आणि ते नक्कीच कंटाळवाणा आहे.
ब्लोग वाचत होतो बरेच मराठी. मला असं जाणवतंय के आता लिहिणारे बरेच जण अमेरिकेत बसूनच लिहितायेत. त्यामुळे त्यांच्या लिखाणाचा आवाका फारच रून्दावलेला आहे. संदर्भ बरेच सखोल आहेत, लिहायच्या प्रेरणा ठोकळेबाज नाहीत आणि जगाच्या पसार्याला शब्दांच्या नक्षीत उमटवायचा निर्धारही जोरदार आहे.
आपलंच आपल्यात इतके शब्द असतात ना, तुला लिहिताना थोडेफारच उमटात असावेत त्यातले. आता सध्या जरा पोटापाण्याचे प्रश्न सतावू लागलेत आहेत, आणि जे शिक्षण चाल्लय त्यातून सहीसलामत पास ह…
हा सगळं उगाच शब्दांचा खेळ बरं. ह्यातून आयुष्याच्या पोकळ ओझ्यात काही फरक पडेल असं नाही. पण जरा २-४ तास बरे जातात. आता अगदी म्हणजे काही वेळेला नकोसाच होतो हा प्रकार हेखरं आहे म्हणा. पण हीच तर मुळात गम्मत आहे ना, कि आपल्याला आवडत नाही त्याच्याशी जास्तीत जास्त जुळवत राहणं, स्वताचे सारे बुरुज शाबूत ठेवणं आणि होईल तेवढा विरंगुळा मिळवणं हेच करायचा ना. मग त्यालाच नाक का मुरडा?
पण आता हे शहाणपण पण नेमक्या वेळी यावा लागता. एकदा शहाण्पानाशीच फटकून वागायची सवय लागली कि मग हळूहळू आपलं कंटाळा सोयीस्कर रित्या दुसर्याच्या पदरात घालायचे बिलंदर उपाय लढवावे लागतात. स्वताच्या भोवती तटबंदी तर उभारता येत नाही कि ज्यामुळे जगाच्या अत्रंग चाळे जामच दिसणार नाहीत, आणि अगदी आपल्याच आत खोल जाऊन पाहता येईल काय आहे काय बाबा हे. पण कान बंद होत नाहीत असे ओपाप, डोळे मिटले तरी प्रतिमांच्या येण्याजाण्याला अडकाव होत नाही. आणि अडवलीत हि दारे जरी, तरी त्यांचा काय ज्यांनी मेंदूचाच ताबा घेतला आहे. मग काय उगाच शहराचे रस्ते गिरवायचे, आयुष्याच्या काळसर कोपर्यात डोकावून दुखालाच नशा करून जगणारीमाणसे पहायची, भोगांच्या उन्मुक्त…

अर्थविभ्रम

मी देणार तरी काय तुला. मी घेत असतो फक्त माझ्या आवर्तात ओढल्या जाणार्या आणि मग विरून जाणार्या प्रत्येकाकडून. आणि बोलू नये खरं असं स्वताच्याच्याच कोशाला गहिरा करणारं, पण हे आवर्त इतका सोपा नाही जितकी सहज समजतीयेस तू. माझं असणं खूपच फसवं आहे, आणि एकदा असण्याच्या विभ्रमाचे रंग उमटले ना तुझ्या तळहातांवर कि मी नसताना तुला कोराच दिसेल तुझा तळहात. मग प्राक्तनाच्या अदृश्य शब्दांची वाट पाहणं आणि आठवणींचे रावे आवरून धरणं अस्तकालीन उद्रेकांच्या दाहापासून. आता लिहितोय हेही विरोधाभासाच्या प्रत्ययी लयीत. ग्रेस आहे खरा ह्या शब्दांत, पण त्याचे शब्द तरी त्याचे कुठे होते?
हे असं कोणाला सांगण्याची सवय असणं वाईटच. कुठेतरी हरवतोच नितळ आपलेपणा. नाहीतर चांदण्याच्या कुंडलीत हवा जन्म, कि जे माणूस गवसाव तेच असावा सार्या सादांचा प्रतिसाद. आपल्यातच जेव्हा ओळख-अनोळखीचा जीवघेणा खेळ असतो ना, तेव्हा समोरचा माणूसही तेच राहत नाही कायम. कधी मौनाला अर्थ बिलगून येतो आणि कधी मौनात सारेच संवेद तडकून जातात, शब्दाच्या जन्माचं भाग्य न मिळाल्याने. तुला परिणीती हवीये माझी तर्कशुद्ध, का संद्याहीन आकारातही तू पाहू शकतेस र…

Nightingale

मला 'Nightingale' ऐकायचय तुझ्यासोबत. मंदपणे लहारायचं सुरांवर, व्हायोलीनच्या तरंगावर दूर दूर जायचय जिथे तू आहेस, पहाट उमलून येताना रात्रीच्या पोटातून, मला तुझ्या कुशीत शिरून ऐकायचंय शरीराचं स्पंदन बहरून येताना.
आठवतं तुला पहिल्यांदा ऐकवलेला हा सुरांचा आर्त अर्थ. आणि मग तू म्हणालेलीस या नंतर नको वाटतं काही,कुठे जाण, बोलणं, अगदी तूही.
रात्रभर जागू, आधी कसे शब्द शब्द असतील नुसते,ग्रेसच्या कविता, आरती प्रभूंच्या शब्दांची वळणे. सगळं सगळं सांगू ना एकमेकांना. कदाचित सुचणारच नाही काही बोलायला, मग असेच बसून राहू, तुझं माझं जवळ असणं अनुभवत. मग रात्र येईल ना उताराला, तार्यांच्या अंगणात मंद गारवा प्रवेश करेल, तेव्हा हातात हात गुंफून तळ्याकाठी चालायला जाऊ. समोरच्या स्तब्ध, निश्चल पाण्यात प्रतीबिम्बांचे विभ्रम किती काय कोडी घालतील, आपण नुसतीच पाहू. तुझ्या माझ्या असणाच्या कोडयापुढे बाकी सगळीच सोपी आहेत. झाडाशी शेवटची गुजगोष्ट करून काही पानं गळत असतील, वारा उडवत नेईन त्यांना, तेवढ्यापुरता झाड हलेल कदाचित आणि मग नव्या पालवीच्या हर्षाने हरखायला मोकळाही होईल.
मग जेव्हा एकटा वायोलिन वाजेल ना, तेव…