Skip to main content

Posts

Showing posts from November, 2010

रिकामटेकडा

खिडकीतून येणाऱ्या प्रकाशाच्या स्पर्शाने त्याची झोप चाळवली. थंडी पडायला सुरुवात झाली होती आणि पांघरूणात गुरफटून घेऊन झोपावं असं त्याला वाटत होतं.. पण त्याचं लक्ष आपसूक घड्याळाकडे गेलं. ८.३० वाजत आले होते..आणि हा शनिवार किंवा रविवार नव्हता .... त्याने कूस बदलली आणि बाजूला पाहिलं तर त्याचा १ मित्र उठून स्वतःच्या घरी गेला होता आणि एक उठून अंथरूण आवरत होता... तोही उठला....रात्री फूटबॉलचा सामना बघून केव्हातरी तो झोपलेला.... त्या आधी जग-दुनियेच्या चर्चा, इकडे-तिकडे फिरायला जायचे बेत आणि मग आपण काही ना काही करण्यात गुंतलेल्या जगातले काही शेवटचे रिकामटेकडे लोक आहोत अशी भोवर्यात अडकल्यासारखी जाणीव..... आपण अजूनही एखादा पिक्चर बघून त्यावर तासन-तास गप्पा मारतो, एखादा लेख वाचून त्याच्यावर समीक्षक मारामारी करू पाहतो, मग शेवटी माणूस असा का करतो ह्याच्या आंधळ्या टोकाला पोचतो, कुठेतरी पोटभर चरतो, कधीतरी आपला दिवस येईल याची उमदी स्वप्ने पाहतो आणि रात्री आपली घरात उंची मावत नाही आणि पिचत जाणार्या घरात साराच जीव ठेचाकाळला जातो म्हणून असे कुठेतरी येऊन लपतो.... उद्यावर ढकलतो आज रिकामं असण्याची तगमग, जिथे…

सूर्यास्त

समोर उंचच उंच इमारती आहेत, म्हणजे स्कायस्क्रेपरस... आणि ही संध्याकाळ आहे.... काही दिवसांपूर्वी 'जल' नावाच्या चक्रीवादळाच्या कारणाने वातावरण ढगाळ होतं... पण आता ते चक्रीवादळ हे कारण उरलेलं नाही..पण वातावरण ढगाळ असतं....रात्री पाउस पडतो...दिवसभर तो ओलसरपणा उरतो....उन्ह कुठेच नसतं.... आणि मग संध्याकाळ येतं....दिवस होतं एवढं दर्शवण्यापुरता उन्ह स्पर्श करून जातं.... आणि त्या उन्हाच्या उबेचा स्पर्श साठतोय तोच संध्याकाळ येते.... संध्याकाळ अस्ताची एक जाणीव असते....जे आहे, सुंदर आहे किंवा आहे ते संपणार आहे त्याची जाणीव....माणसाच्या मर्यादित अस्तीवाची, जाणिवांची जाणीव.... त्यात उदास होणं आहेच, पण समजूतदारपणे जर ते उदास होणं टाळला तरी एक निस्तब्धता उरतेच....समोर अस्ताला जाणारे सूर्यबिंब आहे आणि मला कोणाला तरी सांगावासा वाटतंय जे माझ्या मनात उचंबळून येतंय हा समोरचा सूर्यास्त पाहताना.... माझ्या डोळ्यातून पाहावा कोणीतरी हा क्षण....माझ्या शब्दांत कोणीतरी भोगावा हा क्षण.....
समोर दोन उंच इमारती आहेत....त्यांचं बांधकाम चालू आहे अजून.... किमान २० मजल्यांच्या आहेत ह्या इमारती.... आणि अजून त…

कबड्डी-कबड्डी- पूर्वार्ध

एक पडकी जागा....जिथे आधीच्या वास्तूचे भग्नावशेष आहेत....आणि तिथे एखादी स्कायस्क्रेपर होण्यापलीकडे काय होणार या मुंबईत.... पण मुंबई एक वेगळी चीज आहे....
ती पडकी जागा साफसूफ होते.... तिथली जमीन सपाट केली जाते....त्यावर नवीन मातीचा थर टाकला जातो आणि एका संध्याकाळी आता या नवीन बनलेल्या मैदान-सदृश जागेच्या चारी कोपर्यानावर क्रिकेटच्या मैदानावर असतात तसे चार प्रखर प्रकाशझोत लागतात....मैदानाच्या एका बाजूला मध्यवर्ती स्टेज बनते... प्रचार नाही,नवा पक्ष नाही, मग आता ही सभा कोणाची..... पुढच्या दिवशी काही कार्यकर्ता वाटणारी माणसे होर्डींग्ज वगैरे घेऊन येतात....राजकीय नेत्यांच्या प्रतिमांनी बरंच भाग व्यापलेला असलं तरी त्या होर्डींग्जवर स्पष्ट असतं त्या मैदानावर होणार्या 'इवेन्ट' चं नाव.... 'महाराष्ट्र राज्य कबड्डी स्पर्धा'
जिथे स्पर्धा होणार त्याच्या एका बाजूला उच्च-मध्यमवर्गीय वस्ती तर लागून असलेल्या रस्त्याच्या दुसर्या बाजूला मराठी आणि उत्तर भारतीय अशी मिश्र वस्ती.... वस्तीला एक मैदान नाही, आहे त्या मोकळ्या जागेत क्रिकेट शिवाय काही खेळलं जात नाही... स्पर्धा बघायला प्रेक्षकांन…

दिव्या दिव्या दिपत्कार

या दिवसात दुख वगैरे गोष्टींची आठवणच यायला नको. उदास वाटायला नको, चुकीच्या जागी अडकून पडलो आहोत असं वाटायला नको, जवळपास खूप माणसे असण्याचा कंटाळा यायला नको, अगदी जवळचं माणूसही गाभ्याशी आपल्याशी अनभिज्ञ आहे असा साक्षात्कारही व्हायला नको. होतोय एवढं खरं, असं वाटतंय एवढं खरं...
काल लोकलमधून येत होतो. एक भिकारीण, थकलेली, त्वचेवर सुरुकुत्यांचा जाळे , अनेक वर्षापूर्वी डोळ्यांवर आलेला आणि आता काहीही कामाचा न उरलेला चष्मा, विरलेली, विटलेली आणि तरीही अंग झाकून असलेली साडी, खांद्याशी एक प्लास्टिकची मातकट पिशवी, हाताची ओंजळ पुढे पसरलेली, आणि किनार्या दुखर्या आवाजात सवयीने म्हटलं जाणारं दीनवाणा गाणं....दिवाळीचे दिवस हे बोनस मिळण्याचे किंवा अर्थव्यवस्थेची पातळी उंचावण्याचे असतात अशाने म्हणून कि काय भिक मागणारे एकूणच शहरात वाढलेले आहेत सध्या....तान्ही पोरं थानाशी घेतेलेल्या तरण्या बाया, आंधळे, जुनिअर कडकलक्ष्मी, हिजडे, पांगळे आणि अनेक प्रकार.... कदाचित ह्या आजी हंगामी नसाव्यात... त्यांना द्यायला माझ्याकडे सुट्टे पैसे नव्हते. दहा रुपयाची नोट द्यावी असं वाटत नव्हतं आणि अशी भिक मागून जगण्यापेक्षा मे…