Skip to main content

Posts

Showing posts from July, 2010

कथेतला लेखक

लेखकात कथा कुठे उगम पावते? कथा त्याच्या कल्पनेत असते का त्याच्या अनुभवाची घुसळण होऊन ती जन्माला येते? कथेच्या मुळाशी निर्मिनार्याचे अनुभव अपरिहार्यपणे असतात का? का निव्वळ कल्पनेच्या सदिश मुक्ततेत कथा उमटत जाते? लेखकाची मनोवस्था आणि आयुष्य दुसर्या कोणाला पूर्णपणे उलगडणे शक्य नाही, आणि म्हणून ह्या प्रश्नांच्या बाबतीत काही ढोबळ अनुमानेच करतं येतील. पण कथेत लेखक कुठे असतो असं विचार केला तर काही सापडू शकेल असं मला वाटतं. मला भावलेल्या काही कथांच्या ( इथे कथा म्हणजे पानांची मर्यादा अशी व्याख्या न ठेवता कथानक अशा ढगळ अर्थाने कथा हा शब्द वापरला आहे) आधारे मी कथेत सापडणारा लेखक मांडणार आहे. अर्थात हा मी घेतलेला, किंवा आपसूक घडलेला शोध आहे आणि ह्यात कोणत्याही साहित्यिक सत्याचा दावा नाही.
ज्या कथांत असं लेखक मला दिसलेला आहे त्या माणसाच्या वागण्यातले विरोधाभास, काही मुल्यांवर विश्वास असणाऱ्या माणसांतला वैचरिक संघर्ष आणि स्वतःच्या विचाराने जागू पाहणाऱ्या माणसात, मध्यवर्ती पत्रांत येणारी घुसळण आणि द्वंद्व मांडणार्या कथा आहेत. John Steinbeck ची In Dubious Battle वाचताना मुळात …

'हिन्दू' अणि पुन्हा एकदा Stream of Consciousness

'कोसला' ची आणि पर्यायाने नेमाड्यांच्या 'stream of consciousness' ची ओळख म्हणजे १० वीच्या मराठीतला 'बुद्धदर्शन' धडा. अजूनही कोणाशी, म्हणजे ज्याला दहावितले धडे आठवतायेत अशा कोणाशी बोलला, कि मी ऑप्शनला टाकलेला तो धडा असे सांगणारेच भेटतात. मला तरी काय कळलेला तेव्हा? पण ती सरळ रेशेसारखी, किंवा टोकदार सुईसारखी समोर दिसणारं दृश्य आणि त्याच्या सोबत मनात उमटणारा अर्थ सलगपणे एकमेकांना शिवत जाणारी नेमाड्यांची भाषा लक्षात राहिली. पुढे कोसला वाचलं, एकदा, दुसर्यांदा, मग एखाद दुसर्या संवाद किंवा ओळींसाठी परत परत. पुढे कुठेतरी 'Catcher in the Rye' आणि कोसला एकच धाटणीचे आहेत असं वाचलं, Catcher बद्दल अजूनही ऐकलं होता म्हणून Catcher हि वाचलं. सारखेपणा वगैरे फारसा काही जाणवला नाही, पण सभोवतालचा जगणं आणि लहानपणापासून आपल्यावर छापले जाणारे संस्कार, त्यातून आणि स्वतःच्या जाणीवेतून भोवतालात घडणार्या आणि जाणवणाऱ्या घडणांची मनात उठणारी वर्तुळे यांच्याकडे कुठलीही चौकट न घेता दिसेल तसा बघणारा 'Stream of Consciousness' डोक्यात गेला, म्हणजे माझ्या लिहिण्याच्या प…

स्थिरचित्र

एक क्षण असा वेगळा काढता येत नाही। पण तरीही कुठल्या तरी एका क्षणाशी थांबून काय चाल्लय सभोवती असा बघायचा प्रयत्न असतोच। स्कॉलरशिपच्या परीक्षेत 'चित्रवर्णन' असा एक १० मार्कांचा प्रश्न असायचा. एखादं दृश्य असायचं त्यात. एका क्षणाशी बांधलेलं . वाहणारी नदी, झाडं आणि नदीवरचा घाट. गजबजलेला बाजार आणि त्यात चित्राच्या मध्यभागी असणारा फुलविक्रेता. शाळा सुटल्यानंतर बाहेर येणारी मुले आणि त्यांना घ्यायला आलेले पालक. किंवा नदीच्या घाटावर चाललेलं कपडे धुणं, अंघोळी आणि कोपर्यात एक मंदिर. मग आईचा हात धरून चालेल्या एखाद्या मुलाचा दुसरा हात हवेतच आहे, कपडे धुणार्या बाईने एक ओला कपडा हवेत वर उचललेला आहे, किंवा नदीच्या प्रवाहावर असणाऱ्या रेषा. मग शाळेत स्थिर चित्र असा विषयच होता चित्रकलेत. अर्थात काही न काढताच स्थिर रहायचं या चित्रकलेबद्दलच्या प्रेमाने आणि शाळेतील शिक्षकांच्या शाररीक शिक्षणाच्या अंगाने चित्रकला शिकवण्याच्या अभिनव पद्धतीने एकूणच स्थिर काय किंवा अन्य कोणत्याही चित्रप्रकाराबद्दल स्थिर अज्ञानच निर्माण झाले. पण एक गोष्ट लक्षात राहिली. स्थिर चित्रात केलेलं प्रकाशाचा चित्रण. अर्थात स्थिर …

नवीन झाडांचा प्रकाश

मी पाहतोय माझ्या शब्दांवर कोणाकोणाच्या खुणा आहेत
कोणाकोणाच्या अभिव्यक्तीची नक्षी उमटलीये माझ्या कोरीव कामावर
आपलेच शब्द शोधणं म्हणजे परत जाण स्वतःच्या पहिल्या टाहोकडे परत,
जगात आल्यावर उमटलेला पहिला स्वर तेवढा असतो अभिजात

आता हा परत उलट प्रवास, आणि आता परत जाण कठीण होत चाल्लय
सोपं असतं हजार वर्षांआधी आपले शब्द, आपला अर्थ शोधणं
आता कशालाही आपलं म्हंटला कि दिसतं कोणीतरी एक चालला होता हि वाट
मग ते चालणं तेवढं माझं रहात नाही

रस्ता रुंद करणं सोपं आहे, त्यात आखलेली असते मूळ दिशा
नवे रस्ते शोधायला आता नवी ठिकाणे उरली आहेत का
काढून झालेत इतके स्तर अस्तित्वाच्या कोड्याचे
आता गाभ्यालाच लागतोय धक्का
कुरतडून ठेवल्यायेत सार्याच श्रद्धा, तार्कीकतेच्या बोथट सुरीने
आपला तर्क हाही विश्वासच असतो, केवळ उघड्या डोळ्यांवरचा

मीच असेन एवढं अनाकलनीय कोणालाही
मी कसा कोणाला समजू शकतो
असा निर्मनुष्य बेट असताना माझं
संवांदांची एवढी जाळी का सभोवती

का स्वीकारत नाही आपण आपली अपूर्णता
का सोडवू पाहतो आपण यच्चयावत कोडी अर्ध्या-मुर्ध्या गृहीतकांवर

का इतके शब्द उधळतायेत चौफेर
खूप झालंय का पिक का लिहिणं सोपं झालंय
इतका भरभरून सापडतोय का अर्थ क…