Skip to main content

Posts

Showing posts from December, 2011

शोकाचे प्रहर उमलता

चारी बाजूनी अंगावर येत घुसमटवून टाकणा-या शांततेच्या भिंती आणि इतका श्वास कोन्डूनही कोणाला सांगायची सोय नाही... किंवा कोणाला सांगून काही फायदा नाही असा पार खोल साक्षात्कार. आपण कोणाला सांगतो आणि मग दुसरा संकटमोचन असल्याच्या नादात सहानुभूती, सल्ले, आपले साधर्म्य असलेले अनुभव असे काही ना काही आपल्या दिशेने टाकू लागतो. ऐक ना बाबा, ऐक, फक्त ऐक. जसे हे वाचतोयेस तसे नुसते एक. तुला मी सांगतोय ते सांगितल्याने तू काही उतारा सुचावशील आणि हे सलत जाणारे दुख आणि गुदमरवणारी शांतता जाऊन खेळत्या हवेचा विलक्षण आल्हाद येईल म्हणून नाही. उलटी केली कि कसं बरं वाटतं तसं जे सांगायचं ते बाहेर पडलं कि वाटतं म्हणून सागतोय...कारण नुसते माझ्याच माझ्यात हे शब्द घुमून, माझ्या शरीराच्या, धमन्यांच्या भिंतीवर निनादून माझ्या आत त्यांच्या प्रतीध्वनिन्च्या लाटा येऊन मी पार बुडून बुडून... ऐक , नुसतं ऐक, नाहीतर तुला सांगताना मी माझ्यात गुरफटून माझ्यातल्या पोकळीशी माझ्या बुबुळातला प्रकाश गिरवत बोलू लागलो कि चुपचाप निघून जा... पण जाताना काही म्हणजे काही सांगू नकोस... 
      काल असं झालं कि मी रात्री एकदम उठलो. माझ्या घरात कि…

मांजर: एक दीर्घांक

मांजर असते एक आयुष्य, भले माणसाचे नसले तरी  तेही चालते पायांवर, तेही आवाज काढते तोंडातून,  तेही खाते आणि उत्सर्जन करते  तेही देते प्रतिसाद त्याच्या भवतालाला आणि एक दिवस तेही जाते होऊन भाग  निश्चेष्ट अनाकलनीय अंधाराचा
मांजर असू शकते काहीही एखाद्या माणसासाठी  अनोळखी आसपास वावरणा-या व्यक्तीसारखे  किंवा मध्येच एकदा रस्त्यात भेटून हसणा-या ओळखीएवढे किंवा ते असू शकते जगण्याची सवय  एकटेपणाचा तात्कालिक तोडगा  किंवा एकपात्री संवादांचे एकमात्र गिऱ्हाईक 
मांजर खाऊ शकते काहीही  ते लपालपा दूध पिऊ शकते  ते खाऊ शकते भात, चपाती, फरसाण, वेफर्स आणि असे तत्सम चकणे ते खाऊ शकते उंदीर, मासे, कबूतर, सरडे  किंवा ते नुसतेच घुटमळू शकते पायाशी  भाव खात
मांजर वावरू शकते त्याच्या वयानिशी त्याच्यावर लादले जाणारे सारे अर्थ घेत  ते मऊसर निरागस होऊन झोपू शकते तुमच्या कुशीत  ते होऊ शकते बिलंदर आणि येऊ शकते तुमच्या घरात कामापुरते  ते होऊ शकते गोल गरगरीत मठ्ठ बोका आणि बोचकारू  शकते तुमच्या वर्षानुवर्षे असलेल्या पालकत्वाला आणि त्याही पलीकडे जाऊन ते होऊ शकते एक इवले छोटे आयुष्य  आणि तुमच्या घराच्या खोबणीत खुशाल बसू शकते प…

पांडुरंग सांगवीकर यांस,

पांडुरंग सांगवीकर यांस,

     अर्धवट पडलेले कॉलेजचे वर्ष सोडून तुम्ही गावातच आहात का अजून? कुठेही असं, पण अशी माझ्या मानगुटीला बसण्याची काही गरज नाही. आपलं झालं थोडं आणि त्यात तुमच्या 'stream of consciousness' चं घोडं असला प्रकार होतोय...आणि तरीही जगण्याच्या सगळ्या टवक्यांकडे टक्क उघड्या डोळ्यांनी बघत त्यातली निरर्थ झिंग घ्यायची खाज जात नाही...आणि म्हणून सांगवीकर मी माझ्या होस्टेलच्या एकांड्या खोलीत परत परत तुम्हाला भेटत रहातो...     आपल्याला लहानपणी मेलेली बहिण नाही, बाप व्यवहारी, कपटी, कुटील, कसबी असा कोणीही नाही.. फक्त जाणिवांचे संवेदनशील तंतू घेऊन जगत राहण्याच्या अफाट लाटेवर तरंगणारा मी आहे... आपल्याला गाव नाही, भाषेच्या २-४ वाटा-वळणांचे ज्ञान नाही... पूर्ण रिकामा रिकामपणा आणि अगदी मध्याशी पोकळ असणारा रिकामपणा असे दोन भाग केले तर आपण पहिल्या भागात आणि तुम्ही दुस-या...  पण एक बिलकूल खरं आहे कि काही करून मैदान मारण्याची इच्छा नसली कि उरणारे बघेपण तेवढे तुमच्या भागातही आहे आणि माझ्याही...       तुमची गोष्ट वाचून संपली...संपली किंवा पुढे पाने नव्हती वाचायला...ती तुमची गोष्ट आह…