Skip to main content

Posts

Showing posts from April, 2011

विसरले जाणारे एक साधे आयुष्य

सदू, चार भावांतला तो तिसरा आणि तिन्ही भावांपेक्षा वेगळा. सदू चार वर्षाचा असताना त्याची आई गेली. त्यांनतर वडिलांनी एका हळव्या जागेसारखा सदूला जपला. सदूचे वडील एका वाड्याचे, त्याच्यापुढच्या निवांत पसरलेल्या अंगणाचे, मागच्या निगा राखलेल्या बागेचे एकुलते एक मालक. खरंतर त्यांच्या चारही मुलांना बायका-पोरांसह पुरून उरेल एवढी जागा वाड्यात. पण सदूचा सगळ्यात मोठा भाऊ अकाली गेला, दुसर्याने कुठल्या एका झटक्यात भ्रमंती आणि ब्रह्मचर्य पत्करले, तिसरा सदू....त्यामुळे चौथ्या भावाच्या बायकोकडे वाड्याची सूत्रे गेली. अर्थात सदूच्या गोष्टीतला हा नगण्य भाग.
  तर सदू चौथीपर्यंत शाळेत गेला. किंवा मास्तर ओळखीचे म्हणून चौथीपर्यंत पुढे ढकलला गेला. वडिलांची आशा होती कि एक दिवस नशिबाचा फासा पालटेल. सदू चार-चौघांइतका, किमान ढोबळ आकार असलेला माणूस होईल. एक दिवस सदू शाळेतून घरी आला नाही. वाटेत कुठेतरी त्याचे दप्तर सापडले. त्याच्याबरोबर वर्गात असलेल्या मुलांना विचारले तर त्यांनी सदूला शाळेतून बाहेर पडताना पाहिल्याचे सांगितले. उरलेला आख्खा दिवस वडील आणि दोन भाऊ त्याला शोधत राहिले. रात्रभर सगळे जागे होते.…

साकी आणि हाडांचे गाठोडे

त्याने पाठीवरचं गाठोडं अगदी पायाजवळ ठेवलं, जसा काही कोणी ते चोरून नेणार आहे. मग त्याने रस्त्याच्या आजूबाजूला नजर टाकली. 'इथपर्यंत यायचं हे तर कळलं होतं. आता पुढे? ' खरंतर तो थकला होता. तसा त्याने प्रवास काही चालत वगैरे केला नव्हता, किंवा त्याच्या कपड्यांवर प्रवासाच्या धुळकट रेषा वगैरेही नव्हत्या. पण तो दमला होता. कोणी पहात नाही असं पहात, गाठोडं खांद्याशी पकडत तो रस्त्याच्या कडेला गेला. त्याने गाठोडं हलवलं आणि कान जवळ नेऊन तो त्यातून येणारा आवाज ऐकू लागला. उगाच काहीतरी खळखळ असा आवाज आला...त्याने दोन-तीनदा हलवून, ऐकून पाहिलं. पण येणाऱ्या आवाजाने त्याला काही कळलं नाही. शेवटी त्याने गाठोडं खाली पायाशी ठेवलं आणि एक सुस्कारा सोडत तो आता रात्रीसाठी थांबायची जागा शोधू लागला. तो आत्ता चालत होता त्या रस्त्याला गजबज होती, रस्त्याच्या शेवटी उजळलेली घरे होती, माणसे घाई-गर्दीत चालत होती. त्याला एकदा वाटलं त्या उजळलेल्या घरांमध्येच कदाचित जायचं असेल, आत्ताच जाऊन पाहूया का? पण तेवढ्यात शंका, भीती आणि अशाच अनाम सावल्यांनी त्याची इच्छा झाकोळून गेली. त्याने पायाशी ठेवलेल्या गाठोद्य…

ओळ्ख, आवेग आणि अजून काही....

'असं खरं होत नाही कधी' त्याच्या मनात विचार आला. तिचा आवाज फोनवर इतका तुटलेला, इतका निर्विकार कधीच ऐकलेला नाही. आणि तोही एकदा नव्हे, मागच्या आठवड्यात तीन्हीवेळा जे काही बोलणं झालं फोनवर ते असंच होतं. आठवड्याभरापूर्वी त्याने असंच तिला फोन लावला. खरंतर फोन बिझी येईल अशीच त्याची अपेक्षा होती. पण तिने फोन उचलला. ती जेवढ्यास तेवढं बोलली आणि बोलणं संपलं. मग परत दोन दिवसाने मंगेशाला अमेरिकेत जायला मिळतंय हे सांगायला त्याने फोन केलेला तेव्हाही ती जेवढ्यास तेवढं बोलली.  मग आज...आज खरतर एकदम असं काहीसं वाटलं कि काहीतरी ठीक नाहीये तिच्यासोबत...म्हणून त्याने फोन लावला. आणि ती बहुतेक करून फोन कट करेल, मीटिंग आहे असा मेसेज पाठवेल असं त्याला वाटलेलं...तसं झालं असतं म्हणजे ती तिचं नॉर्मल आयुष्य जगते आहे हे त्याला कळलं असतं. पण तिने फोन उचलला. त्याने दोन-तीनदा खोदून विचारलं तेव्हा भेटूया आज असं म्हणून तिने फोन ठेवला. खरंतर कुठे, कसं भेटायचं हे तिने ठरवायचं आणि ह्याने पाळायचं हा नियम. पण आज सगळं त्यालाच ठरवायचं होतं. 'ठीके. दिवसभरात ठरवू आणि दुपारी सांगू तिला.' असं ठरवून त्…