Skip to main content

Posts

Showing posts from January, 2011

शेवटचा प्रखर लख्ख प्रकाश

'तो धावत होता, अंगावर एकही कपडा नसताना, आणि त्याच्या पाठी अजून कोणीतरी...जो कोणी पाठीमागून येत होता तो त्याला घट्ट मिठी मारू पहात होता. शिसारी आणणारी, गुदामरवणारी आणि तरीही अंग पेटवणारी मिठी... मग एकदम त्या मागच्या चेहेर्याचा चेहेरा बदलत होता, कधी ओळखीचा, स्त्रीचा, पुरुषाचा...आणि त्याचा  हात लालसेने ह्याच्या शरीरभर फिरत होता. मग एकदम एक जीवघेणा क्षण, असह्य ताण असलेला, कोसळणारा...' तो खाडकन जागा झाला. त्याने मोबाईलवर वेळ पहिली. रात्रीचे ८ वाजत आलेले. जवळपास दीड तास तो झोपलेला. आणि आता जाग आल्यावर अजून गळून गेल्यासारखं वाटत होतं. तो तसाच पडून राहीला. समोरच्या खिडकीतून समोरच्या बिल्डींगचे दिवे दिसत होते. खालच्या मजल्यावर कोणीतरी लावलेल्या गाण्याच्या ओळी, मागच्या बाजूच्या झाडांवरून येणारा कावळ्यांचा तीक्ष्ण आवाज, वरचा एका अशक्त मलूल लयीत फिरणारा पंखा, तटस्थ उभ्या टेबलावर अस्तव्यस्त पुस्तकं, अंगाभोवती अर्धवट लपेटली गेलेली चादर... तो कुशीवर वळला. त्याच्या नाकाची, ओठाची, गालाची एक बाजू उशीला टेकली. घामाचा, लाळेचा जुनाट वास जाणवायला लागला. किती दिवस ही उशी अशीच बिना अभ्…

इन्फ्लेशन

रस्त्याच्या कडेला वाढणारा एक मुलगा
त्याचा एक अखंड बेवडा बाप
कधीतरी आलेल्या मायेच्या अल्कोहोलिक उमाळ्याने
द्यायचा पोराला ५ रुपयाचं नाणं
आणि परत पडून राहायचा नशेत धुत्त...किंवा बिडी पेटवून
कुठेही बघत रिकाम्या गर्द नजरेने झुरके मारत बसायचा....
पोरगा पळत जायचा...
रस्त्याच्या धुतल्या-न्ह्याल्या माणसांच्या पायातून वाट काढत
सरकणारी चड्डी सावरत, झिपर्या आवरत
तो स्तब्धपणे उभा राहायचा वडापावच्या खमंग वासाने....
मग खेकासणाऱ्या दुकानदाराच्या हातात लुप्त व्हायचं
पाचाचा नाणं, आणि हातात यायचा वडापाव आणि मिरची
मग पुढचे काही क्षण गाठ पडायची हाताची-तोंडाची
बोटही चाटत संपायचा वडापाव
निवायचा पोटातला डंख
मग परत गाठायची रस्त्याची कड, गोल गोल फिरवायचा टायर
किंवा हात पसरायचा ओशट केविलवाणा स्पर्श करत
चेहेर्यावर पसरत पोरके केविलवाणे भाव

आजही बापाने दिले ५ रुपये,
मुठीत घट्ट पकडून तो वडापावच्या दुकानासमोर उभा राहीला
बापाची माया आणि नशा होती तेवढीच....
५ रुपयाच्या नाण्याचा जड बंदा स्पर्शही तसंच....
भूक तेवढीच पोटात, किंचित वाढलेली वाढत्या वयात, वाढत्या थंडीत
आज वडापाव तेवढा आला नाही हातात....
फक्…

प्रिय मी,

प्रिय मी, 
तू काय करतोयेस असं प्रश्न पडल्याने आता असे पत्र पाठवण्याची वेळ आली आहे....
                     तू वर्तमानपत्रातल्या बातम्या वाचून अस्वस्थ वगैरे होतोस, आणि मग पुस्तकांच्यात वगैरे डोकं
खुपसून वर्तमानपत्रातल्या प्रश्नंची उत्तरे शोधू पाहतोस....
त्या वर्तमानपत्रात असणारा वर्तमान केव्हाच पळवला गेला आहे, आणि तिथे मायावी भविष्यकाळ पुरवला जात आहे
वर्तमान म्हणून.... लख्ख उजळ किंवा गडद अंधारा....
ज्यांच्या बापाने स्वतःच्या पायाने चालणं सोडून कित्येक वर्षे झाली आहेत आणि जे छान सोनेरी पाळण्यात जन्मले होते,
ज्यांच्या वाटा आणि त्यावरची संकटे गोष्टीतल्या राजकुमार-राजकुमारी सारखी होती तेच आता
रस्त्यांवर चालणाऱ्या आणि पाऊलभर सावली जपून ठेवणाऱ्या लोकांच्या आयुष्यांचा अभ्यास करून निष्कर्ष काढतायेत....
त्यांच्या भरपेट ढेकरांमध्ये कसे तुला अदृश्य आयुष्याचे आवाज ऐकू येतील?
पानोंपान अक्षरात दिवेसेन दिवस पिचत जाणार्या माणसांची स्वप्ने, तोकडे आनंद आणि अनंत अतृप्त इच्छा उमटत नाहीत....
त्या जगून पाहाव्या लागतात आणि त्यांचे वळच आयुष्याच्या वाटांना आकार देतात....
हे लिहिणारे, स्तंभ, सदरे आणि अग्रले…

बेरात्रीच्या कविता

खुणावलं नाही डोळ्यांच्या तळ्यांनी
काळजाच्या कळ्यांना हुरूप उरला नाही
ओसरून गेला बहर आणि झोपून गेलं शहर
विरहाच्या वेदनांना तितके जहर उरले नाही

निर्मनुष्य रस्त्यांना हाक घालते रात्र
पिवळा प्रकाश अंधाराचा स्पर्श रोखून आहे
तसे सामावले विश्व आता गादीत आणि गोधडीत
गात्रांची उष्णता शरीराचे कुंपण जोखून आहे

गटार झोपले आहे, नाल्याने बदलली आहे कूस
कडेला एक भिकारी केव्हाचा पडून आहे
लुचत आहे पिल्लू कुत्रीच्या स्तनाला
अख्खा उद्या स्वप्नांच्या बांधाला अडून आहे