Skip to main content

Posts

Showing posts from January, 2016

इस्लाम, आय.एस. आणि पाकिस्तान ह्याबद्दलची ३ पुस्तके

मी अमेरिकन लायब्ररीचा मेंबर होतो, जवळपास ११ वर्षांमागे तेव्हा तिथे दहशतवादावरच्या पुस्तकांचं एक आख्खं सेक्शन होतं. मी त्या सेक्शनला फार हात लावत नव्हतो. मुळात तेव्हा मला वाटायचं की काही लोक आहेत जे दहशतवादी आहेत आणि येन केन प्रकारेण त्यांना मारून टाकणं हे अगदी बरोबर आहे. लादेन हा त्यांचं म्होरक्या आहे आणि एका ठराविक धर्माच्या लोकच दहशतवादी असतात. गेले ते दिवस.        ११ वर्षानंतर लादेन मारला गेलेला आहे, पण इस्लामिक स्टेट नावाचा प्रकार त्याहून भयंकर तबाही माजवतो आहे. हे दोघे वेगळे आहेत. देश, धर्म आणि आर्थिक उद्दिष्टे ह्या सगळ्याचा झांगडगुत्ता झालेला आहे. हे एवढं मला समजलेलं आहे.        श्रद्धा आणि त्यातून निर्माण होणारी कृत्याची प्रेरणा हे मला कुतुहलाचे विषय वाटतात. अनेकदा बुद्धीजीवी माणसे श्रद्धाळू माणसांच्या गटाचे स्पष्टीकरण देताना श्रद्धाळू गटाचे नेते कसे भोंदू आहेत, कसे विसंगत आहेत आणि कसे त्यांच्या स्वार्थासाठी अन्य लोकांच्या श्रद्धेचा वापर करून घेत आहेत असे मॉडेल वापरतात. माझ्या मते हे तसे तोकडे स्पष्टीकरण आहे. बुद्धीणे विचार करणारा  हे श्रद्धा पटकन समजू शकत नाहीत आणि त्या…

फसके आणि फसवे प्रयत्न

१.‘वझीर’ बघणं ही एक disappointment ठरली. अगदी सुरुवातीपासूनच चित्रपट प्रेडिक्टेबल बनला. अर्थात इथे मी अनेक देशी-विदेशी चित्रपट बघतो ही बाब आहेच. हा बेनिफिट ऑफ डाउट ‘वझीर’ ला द्यायला हवा की अनेक प्रामुख्याने हिंदी चित्रपट बघणाऱ्या, किंवा नव्या चित्रपट प्रेक्षकांना ‘वझीर’ अधिक आवडू शकतो. मला स्वतःला नंबियारचे आधीचे ‘डेव्हिड’ आणि ‘शैतान’ आवडले होते. त्यामुळे मला ‘वझीर’ चा भुसभुशीतपणा अधिक जाणवला. फरहान अख्तरचं काम मला आवडलं. अमिताभचा एकूणच प्रकार थोडा ओव्हर-रेटेड वाटतो. ऑन डिमांड खलपुरुष, जे थोडसं ‘डेव्हिड’ मध्येही होतं, ते इथे अति होतंय.    ह्याच प्रकारात मग ‘तलाश’ बरा होता. Uncertain character तिथे अधिक चांगल्या प्रकाराने हाताळलं गेलं होतं. ‘वझीर’ बघताना मला ‘The Illusionist’आठवत होता, विशेषतः शेवटच्या प्रसंगात. शतरंज, प्यादा वगैरे उगाचच. इन ऑल, पैसे वाया जाणार नाहीत, रिटर्न ऑन मनी, नाही! 2  २.  १४ जानेवारी हा पानिपतच्या लढाईचा स्मरणदिन असतो असं मला फेसबुकवर लोकांचे अपडेट्स पहात कळलं. मग कळलं की पानिपत हे मराठ्यांचे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदान आहे!
‘कौरव पांडव संगर तांडव द्वापर क…