Skip to main content

Posts

Showing posts from March, 2013

च्युXXकथा-१ : होळी रे होळी

इशारा: प्रस्तुत ब्लॉगपोस्ट ही ब्लॉग लिहिणाऱ्याच्या मनोरंजासाठी आहे. त्यात अन्य कोणाच्या मनोरंजनाचाही हेतू खरंतर नाही. तसे झाल्यास तो केवळ योगायोग समजावा. तसेच सामाजिक संदेश, सामाजिक विधायक बदल, राष्ट्रनिर्मिती, संस्कार असा कुठलाही साईड इफेक्ट साधण्याचाही ह्या लिखाणाचा हेतू नाही. ब्लॉगरच्या क्षुद्र अस्तित्वापलीकडे हे सर्व आहे. च्युXXकथा-१ : होळी रे होळी
      अम्या आणि पम्या हे खास मित्र होते. म्हणजे त्यांचे बालपण, त्यांची शाळा, त्यांचे तरुणपण हे सोबत गेले होते. पण त्यापलीकडे जाऊन ते एकाच प्रकारच्या पालकांच्या पोटी जन्माला आले होते. त्यांना एक एक धाकटी वगैरे बहिण होती. त्यांना शाळेत ८० ते ९० टक्केच्या दरम्यान मार्क मिळत. त्यांच्या आयांना ह्या गोष्टीचा सुप्त अभिमान वाटे. त्यांचे वडील तेच सरकारी ऑफिसात प्रामाणिक, निस्पृह असे (किंवा बाकी काही म्हणत तसे नेभळट किंवा गांडू) कार्यरत होते. त्यांच्या आधीच्या पिढ्या तश्याच कोणत्या गावी वगैरे असत, पण आता हे सारे पिढ्यान-पिढ्या नोकऱ्या करत कृथार्थ होत रिटायर होत. काही फरकही होते. जसे अम्या आणि पम्या हे कोणीही सरकारी कर्मचारी नव्हते. ते दोघेही जसे …

साहिब, बीबी आणि...... ब्लॉगपोस्ट

मी पहिल्यांदा 'साहिब, बीबी और गँगस्टर पाहिला तेव्हा एका परक्या शहरात वेळ घालवणं हा माझा उद्देश होता. पण एकदम ते जुगनी सुरु झालं, मग एकदम ते निवांत रस्ते, खानदान, राज्य अशा तमाम ऐतिहासिक धुंदीत जगणारी माणसे, इशाऱ्यागणिक उडणाऱ्या गोळ्या, आणि अदमास न येणारा शेवट असं आलं आणि मला तो साहिब, बीबी आणि गँगस्टर लक्षात राहिला. मग तीग्मांषु धुलिया भेटले ते गँग्स ऑफ वासेपूर मध्ये रामाधीर बनून, 'बेटा, तुमसे न हो पायेगा' ,'जबतक ये सानिमा है हिंदुस्तान मे लोग चुत्या बनते रहेंगे' वगैरे खास बोलताना. सोबत पानसिंग तोमर, आणि आता 'साहिब, बीबी अन्ड गँगस्टर रिटर्न्स'  ..
     मला तर हा पिक्चर आवडलेला आहे. तो मी तीन दिवसांत दोनदा पाहिलेला आहे. पण हे तर आत्मचरित्रपर झालं, आपण थोडं ब्रॉड होऊया.
    तर 'हासिल' मी जेव्हा पाहिला तेव्हा माझा भ्रमनिरास झालेला. माझ्या एका मित्राने युनिव्हर्सिटी पोलिटीक्स वगैरे कसं जबरदस्त आहे त्यात वगैरे सांगून मला तो बघायला लावला होता. आणि पहिला हाफ होताही ग्रीपिंग, छा जानेवाला इरफान खान असलेला. पण नंतर कुंभमेळा, हिरो-हिरोईन यांचं शाश्वत वगै…

चाळेगत- कदाचित १

हा मला मिळालेला एक प्राचीन खो आहे. जिथून हा खो उगम पावला आहे तिथे दोन प्रकारच्या गोष्टी उगम पावल्या आहेत, एक अशा कथा-कादंबऱ्या ज्या वाचक वर्गाने डोक्यावर तर घेतल्या आहेत, पण तशा त्या काही फार खास नाहीत. किंवा अशा काही कथा-कादंबऱ्या ज्यांत काहीतरी वेगळं, वाचनीय, अस्वस्थ करणारं किंवा आपल्याला न स्पर्श केलेलं आहे, पण अजून त्या कादंबऱ्यांना हवं तेवढं नाव, वलय, प्रसिद्धी नाही.       पहिला कोणाची मारण्याचा प्रकार, वैयक्तिकरित्या मला खूप आवडत असला तरी आत्ता मला तो नेमका कशावर वापरावा हे सुचत नसल्याने बाद आहे. मग राहिला दुसरा.       ‘चाळेगत’ बाबत मी पहिल्यांदा वाचलं होतं ते शांता गोखल्यांनी ‘मिंट’ नावाच्या एका पिंक पेपरच्या शनिवार पुरवणीत दिलेल्या एका मुलाखतीत. त्यात मराठीत दोन नवे उमदे लेखक कोण वाटतात ह्या बाबतीत त्यांनी दोन नवे लेखक आणि त्यांची आवडलेली पुस्तकं सांगितली होती. त्यात एक होते (जरी त्यांनी ‘अय्या’ नावाचा जबरी कलात्मक चित्रपट काढून मज सारख्या चाहत्यांच्या थोतरीत दिल्यासारखी केली होती) ते सचिन कुंडलकर आणि त्यांचे ‘कोबाल्ट ब्ल्यू’ आणि दुसरे म्हणजे प्रवीण बांदेकर आणि त्यांचे ‘…