Skip to main content

Posts

Showing posts from December, 2012

गवत्या

पीपल्स बुक शॉप मध्ये एकदम मला गवत्या दिसलं. मिलिंद बोकीलांचं नवं पुस्तक, थोडं अपिलिंग कव्हर, आणि दोन दिवस पुरू शकेल असं जाडजूड पुस्तक. मी ते घेतलं. घेताना त्याची ३२५ रुपये किंमत लक्षात राहिली.       याच्या आधी मी बोकीलांचं ‘समुद्र’ वाचलं होतं. आणि तेही अर्थात एका बुक स्टॉलवर. आणि त्याचा प्लॉट अगदी पहिल्यापासून उलगडलेला होता. मला बोकील, अर्थात माझ्यासाठी, थोडे प्रेडिक्टेबल, स्टिरीओटाईप होतायेत की असं वाटलं तेव्हा.       गवत्याच्या पहिल्या काही पानातच समुद्र वाचल्यानंतर जे काही वाचलं होतं ते पार बाजूला जाऊन पडलं. ‘समुद्रापारचे समाज’ किंवा ‘जनांचे अनुभव पुसता’ या पुस्तकाच्या सुरुवातीला मिलिंद बोकिलांनी ते स्वतः सामाजिक स्वरूपाच्या कामाकडे कसे आले, संशोधनाकडे कसे वळले ते लिहिलं आहे. तीच प्रस्तावना कदाचित गवत्याच्या मुळाशी असावी. अर्थात गवत्या, हे अनुभव कथन किंवा आत्मनिवेदन नाही. ते फिक्शन आहे. फिक्शन म्हटलं तरी मुळात ते फिक्शन जन्माला येतं असा एकतर आपल्याच अनुभवाचा एक ढाचा असतो किंवा आपण मुळातच एक ढाचा कल्पतो. गवत्याच्या पाठी बोकिलांच्या कामाचा, आयुष्याचा, त्यांना भेटलेल्या माणसांचा ढाचा …

महागुहा

|ऑरवेल साहेब आणि बाकी जे साहेब अशा सगळ्यांना|
मागचे चार दिवस जंगल चिडीचूप होतं. नेहमी सारखी झाडे सळसळत नव्हती. नेहमीसारखी कुरणे गजबजलेली नव्हती. अगदी रात्रीही तळ्याच्या काठी पाणी प्यायल्या येणाऱ्यांचे डोळे लुकलुकत नव्हते. वाळली पाने आवाज न करता पडत होती. साप फुत्कारत नव्हते. माकडे झाडांवरून उड्या मारत नव्हती. गच्च दाबून भरलेली शांतता तेव्हढी सगळीकडे. त्या शांततेचा माग काढला तर तो एका अक्राळ-विक्राळ दाराशी पोचून थांबत होता. पण तिथून पुढे नाही. त्या अक्राळ-विक्राळ दाराच्या समोर क्रूर सुळे असणाऱ्या लांडग्यांची झुंड निश्चल उभी होती. त्यांच्या डोळ्यात भूक होती. पण त्यांचे टवकारलेले कान त्या अक्राळ-विक्राळ दाराच्या आडून काय आवाज येतो याचा सुगावा काढण्यात लागले होते. अधून-मधून त्यांच्यातला, तोंडातून लाळेचा ओघ गळणारा एखादा लांडगा दाराच्या आतल्या अंधारात डोकावून पहायचा. त्याच्या डोकावण्यासोबत जपून पाहिलं तर एक खूप दबल्या आवाजातली चर्चा ऐकू आली असती.        आत चार कोल्हे एकमेकांकडे तोंडे करून बसले होते. त्यातला एक तरुण होता, एक मध्यमवयीन, एक म्हातारा, तर एक जख्ख म्हातारा. पण सारेच मागचे दोन पाय म…