Skip to main content

Posts

Showing posts from April, 2012

निषिद्ध वळणापाशी

बोलून बोलून शब्द थकतात आपले,  आणि खूप काही खुणावणारे मौन तरंगत राहते  रात्र थांबते, रेंगाळते, उद्या वाटतो खूप दूर  खरा नकोच असतो तो यायला,  निग्रहाने जपलेले अन्तर एकदाच ओलांडून जावे
आणि...
होत नाही असं आणि गळा घोटणार्या शांततेला फोडावं म्हणून  आपण परत हे-ते बोलू लागतो.. आपण कोण आहोत, एकमेकांचे? काळ-वेळ जुळून आलेले सहप्रवासी,  जे वेडसर एकटेपण रोखून ठेवण्यासाठी एकमेकांची सोबत देतायेत.. आणि सोबतीची सवय झाली तरी तिला काहीच नाव देत नाहीयेत... आई-बाप नसलेल्या पोरासारखे क्षण आपले, वेगळे झालो कि नव्हतेच काही म्हणायला मोकळे ठेवणारे.. सोय आणि सवय यांच्यामध्ये  परत एकदा आलेली शांतता.. मला कुशीत शिरायचं तुझ्या.. मला तुझं बोट धरून तुला शोधायचय, तुझ्या गंधित मोकळ्या देहात... मी यातलं काहीच सांगत नाही,  आणि तूही काहीच बोलत नाहीस.. 
यापुढे दोन वाटा जातात जानम,  एक तुझ्या त्वचेच्या तप्त कल्लोळात हरवणारी,  मांसल, तलम वळणे घेत असोशीच्या क्षणिक तृप्तीशी जाणारी वाट... आणि तिच्या पुढे,  तू जगलेल्या पुरुषांच्या यादीत माझे एक नाव, आपल्या आधीच केलेल्या करारांशी विश्वासघात आणि एकमेकांशी अनोळखी होऊन सुट्टे सुट…

चंद्रमाधवीचे उरले चांदणे

तू गेलास म्हणून मला हे लिहावसं वाटलं. खरंतर कोणीही कवी गेला कि त्याच्यापाठोपाठ भावनांचे विलक्षण खेळ करणाऱ्या श्रद्धांजल्यांची धांदल उडते. आणि बरेचदा कवी भावनाविवश हार-फुलांत हरवून जातो आणि माणसाचे वर्णनच कवी म्हणून केले जाते. तू मेलायेस, तुझ्या दाढी-मिशा, तुझ्या कविता ज्या हातानी लिहिल्या गेल्या असतील ते हात, संध्याकाळ  प्रतिबिंबित झालेले तुझे डोळे वगैरे वगैरे ज्याचे होते तो माणूस , त्याचा देह आता नाही. कवी मरतो जेव्हा त्याच्या शब्दांनी जे सांगायचे ते ऐकणारा कोणीच उरत नाही. तू अजून जिवंत आहेस त्यामुळे...   ह्याच्या आधीही असेच काही कवी असेलेले मनुष्य गेले. अजूनही त्यांच्या स्मरणाचे ताबूत दरवर्षी कोणी ना कोणी बांधतोच. तुझेही असतील. परवा असेच तुझ्या आठवणी सांगणारे, अपरिहार्यपणे तुझ्या मनुष्य म्हणून असण्याचा लेखा-जोखा मांडणारे काही दिसले. एक तुझ्या मित्राचा लेख सोडला तार बाकीचे मी फार वाचलेच नाहीत. हा तुझा मित्रही शब्दांचे भोग भोगणारा कलंदर. त्यानेही असंच म्हटलंय, त्याच्या कविता आहेत तोवर तो आहेच...   तू, म्हणजे तुझ्यातला कवी. मला खरंतर तुझं नाव थट्टा म्हणूनच  कळलेलं. तू म्हणायचास तशी त…