Wednesday, October 19, 2011

आणि तू उरतेस

आणि तू उरतेस
रंध्रांत जगणारे सुप्त कल्लोळ बनत...
लचका तोडत जाण-या आठवणींचा निखारा होत...
कवितांचे रंग बावरे पक्षी 
आणि त्यांच्या पंखावर ठसे तुझ्या निसटत्या बोटांचे
दृश्याच्या फटीतून निसटणारा अंधार 
आणि त्याच्या आडोश्याला जागवलेल्या देहाच्या शेकोटीत 
सरपण होत जाळणारे तुझ्याच देहाचे अपभ्रंश 
आणि तू उरतेस 
भिनत जाणारे दंश होत
नितळ होत जाण-या शब्दाचा अंश होत 
प्रकाशाच्या बिलोरी कवडश्यावर
गोंदण तुझ्या प्रतीबिम्बाचे 
सावलीच्या समतल अस्तित्वात 
तुझे श्यामल गूढ 
संध्येच्या किना-यावर सांधलेल्या क्षणावर 
दाह दाह होत जाणारी तू 
आणि तरी तू उरतेस 
मौनाचा देश बनून 
अंधाराच्या कराल कुशीतली 
चमकती रेष बनून

जेरी पिंटो ह्यांचे 'Murder in Mahim'

मला ह्या कादंबरीमध्ये सर्वात जास्त काय आवडलं असेल तर रोमन भाषेत येणारे हिंदी आणि मराठी शब्द. छ्या/छे असा उच्चार असलेली इंग्लिश कादंबरी अजून...