Tuesday, October 25, 2011

स्तब्धतेच्या पारदर्शी तळ्यावर

स्तब्धतेच्या पारदर्शी तळ्यावर 
मौनाचा तवंग येतो 
शब्दांचे दगड गाठतात 
निरर्थाचा तळ 
काळजाशी उरते 
मुकी कळ

वा-यावर तरंगत येते 
हळव्या सुरांची वेळ 
त्वचेवर येतो 
निर्मितीचा ओला शहारा
तृप्तीच्या फेसाळ लाटांना 
मिळतो शरीराचा किनारा 

पसरत जाते आरपार 
नशीली धून 
अर्थाच्या उबेने येतात 
शब्दांना मोड 
कवितेच्या धूसर अस्तित्वाला 
येते जगण्याची ओढ  
 
विरत जाते ओढाताण 
भागत जाते तहान
शब्दांना तेवढी असते 
एकाकी पोरकी जाण

मागे पडतो रस्ता 
वळणे सुटून जातात 
शब्द उरतात मागे 
अर्थ हलके मिटून जातात  

आजचे मरण उद्यावर ढकलले

  आजचे मरण उद्यावर ढकलले , तसे उद्याचे कलले किंचित परवावर , आणि परवाचे अंशतः तेरवावर टीचभर जागा झाली तिथे थोडे बूड टेकले खोल श्वास घे...