Skip to main content

Posts

Showing posts from May, 2010

प्रश्न

अजमल कसाब दोषी जाहीर झाल्याचे वृत्तपत्रे ओरडून सांगत आहेत. दोन दिवसापासून ह्या निकालाची उत्सुकता प्रसारमाध्यमे जागवत आहेत. आणि आज ब्लौग, फेसबुक अशा सार्या स्व-अभिव्यक्ती माध्यमातून प्रतिक्रिया उमटत आहेत. ह्या प्रतिक्रियांचा सूर समान आहे, हताश.
कसाब दोषी आहे हे सुमारे दीड वर्ष खटला चालवून का सिद्ध करत बसायचा? न्यायदानाची प्रक्रिया सर्वांसाठी समान हवी हे मान्य आहे. पण हे 'सर्व' म्हणजे ह्या देशाचे नागरिक. कसाब हा परकीय नागरिक असून त्याने भारताविरुद्ध युद्ध छेडले हा जर त्याचा गुन्हा असेल तर त्याच्यासाठी भारतीय नागरिकाला लागू असणारी न्यायदान प्रक्रिया का वापरायची? त्याला फाशीची शिक्षा दिली कि कदाचित मानवाधिकार प्रेमी सर्वोच्च न्यायालयात जातील. काही जणांना अशा पद्धतीने एका परकीय नागरिकाला फाशी देता येईल का असा आंतराराष्ट्रीय प्रश्न पडेल. कदाचित त्याला २-३ जन्मठेपांची शिक्षा मिळेल आणि राजीव गांधीना मारणाऱ्या नलिनीच्या कोठडीत सापडला तसं त्याच्या कोठडीत मोबाईल सापडेल. का व्हायचं नाही हताश? माझ्या एका मित्राने कदाचित ह्याच प्रश्नाच्या किंवा ह्याच्या मुळाशी असणाऱ्या काही प्रश्नांना पकडू…
रात्रीच्या भासानी विणलंय एक हळुवार कोश
प्रश्नांचं काहूरही आत्ता निद्रिस्त
ओलांडत गेलो ते प्रदेश स्मरणांच्या गंधाआड
राहिलेल्याची हुरहूर मंदावून मालवलेली

शांततेचा नाद जाणीवेच्या समेवर येऊन
मी आहे त्या क्षणात निवांत
स्तब्धता अशी, श्वासांच्या वेशी फिकट झालेल्या
मलाच येईना माझा बोलावा
काळजाच्या तळाशी सुखान्ती ओलावा

टिकेल कुठवर हे मौनाचे मृगजळ
कुठवर थांबेल विभ्रमी वादळ

उमलत्या फुलाला मातीच्या
शाश्वताचा दिलासा
शांततेच्या पटलावर अधुर्या
चांदण्याचा कवडसा