Sunday, May 2, 2010

रात्रीच्या भासानी विणलंय एक हळुवार कोश
प्रश्नांचं काहूरही आत्ता निद्रिस्त
ओलांडत गेलो ते प्रदेश स्मरणांच्या गंधाआड
राहिलेल्याची हुरहूर मंदावून मालवलेली

शांततेचा नाद जाणीवेच्या समेवर येऊन
मी आहे त्या क्षणात निवांत
स्तब्धता अशी, श्वासांच्या वेशी फिकट झालेल्या
मलाच येईना माझा बोलावा
काळजाच्या तळाशी सुखान्ती ओलावा

टिकेल कुठवर हे मौनाचे मृगजळ
कुठवर थांबेल विभ्रमी वादळ

उमलत्या फुलाला मातीच्या
शाश्वताचा दिलासा
शांततेच्या पटलावर अधुर्या
चांदण्याचा कवडसा

आजचे मरण उद्यावर ढकलले

  आजचे मरण उद्यावर ढकलले , तसे उद्याचे कलले किंचित परवावर , आणि परवाचे अंशतः तेरवावर टीचभर जागा झाली तिथे थोडे बूड टेकले खोल श्वास घे...