Sunday, October 22, 2017

मध्ये वाचलेली काही पुस्तके -१

१. मनू जोसेफ: मिस लैला, आर्म्ड  अँड डेंजरस (फिक्शन, इंडियन इंग्लिश)
 Manu Joseph has strong cynicism about almost everything in the world. पण ह्या पुस्तकात तो काहीवेळा, विशेषतः सुरुवातीच्या काही भागांत अगदी ओसंडून जातो. २०१४ नंतर आलेल्या सरकार आणि त्यापाठी असणाऱ्या विचारसरणीवर टीका, अशी टीका करणाऱ्यांचे दुटप्पीपण आणि twist असलेली गोष्ट असं सगळं १६० पानांत नीट बसत नाही. पण कथेचा फ्लो वेगवान आहे. 
माझ्यामते, 'सिरीयस मेन' आणि 'Illicit Happiness of other people' ह्या आधीच्या दोन पुस्तकांपेक्षा 'मिस लैला' बरंच तोकडं पडतं. 

२. शेहान करुणतिलका : चायनामन - द लिजंड ऑफ प्रदीप मॅथ्यू  (फिक्शन) 
संपू नये वाटणाऱ्या गटातलं पुस्तक. पण क्रिकेटच्या संज्ञा आणि थोडीफार माहिती नसेल तर पुस्तक वाचणं बोरिंग होणार. पण क्रिकेटबद्दल वाचणं आवडत असेल तर पुस्तक मस्ट आहे. माझ्यासाठी, म्हणजे माझ्यात जो शालेय वयातला क्रिकेट फ्रिक आहे त्यासाठी,  श्रीलंका क्रिकेट टीम ही एनिमी नंबर १ आहे. १९९६ ते १९९८ ह्या दोन वर्षांत जयसूर्या, महानामा, रणतुंगा, वास आणि मुरलीधरन ह्या लोकांनी भारताला इतकं हरवलं होतं कि बस्स! विशेषतः लांडग्याने बकऱ्यांना जिणं हराम करावं तसा जयसूर्या वेंकटेश प्रसाद आणि बाकीच्या प्रवासी फास्ट बॉलरना बदडतो आहे हे तर एक भयावह चित्र होतं. आज काळाची गती अशी आहे कि श्रीलंका भारताला हरवेल हे बांगलादेश भारताला हरवेल ह्यापेक्षा कमी शक्य वाटतं! 
भन्नाट पुस्तक, पण entry restricted! 

३. नायोमी मुनवीरा: Island of Thousand Mirrors (फिक्शन) 
श्रीलंकेमधलं सिव्हील वॉर सुरू होण्याच्या काळाचं वर्णन खूप तरल, व्यक्ती हा दृष्टीकोन पकडून केलेलं आहे. सुरुवातीचा भाग सावकाश ग्रो होतो , त्यांतल्या पात्रांना स्पेस आहे. पण नंतर कथेच्या केंद्रवर्ती पात्राची वैयक्तिक दास्तान आणि त्याच्या पार्श्वभूमीला श्रीलंका अशा प्रोफेशनल लेखक पद्धतीने कादंबरी जाते. 
पण तरीही वाचावी अशी. 

४. Liu CIxin: Three Body Problem (सायन्स फिक्शन)
ज्याला 'हार्ड सायन्स फिक्शन' म्हणतात अशा जॉनरची कादंबरी. वाचताना फिजिक्समधील संज्ञा माहिती असणं गरजेचं आहे अन्यथा वाचूच नये. एकदम डेन्स आणि डोकं हलवू शकेल असा हा पहिला भाग.  Remembrance of Earth's Past अशी त्रयी आहे. पुढचे दोन भाग सावकाश वाचणार आहे. 

५. मो यान: Garlic Ballad (फिक्शन) 
मो यानला २०१२चं नोबेल मिळालेलं आहे. कल्चरल रिव्होल्युशन ह्या टप्प्यांत चीन अंतर्बाह्य घुसळून निघालेला आहे. आजचे चीनचे आघाडीचे लेखक ह्या प्रामुख्याने ह्या काळांत शेप झालेले आहेत. चायनीज लेखकांचं मला वाटतं ते मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्यात सावकाश स्टोरी डेव्हलप करायचा प्रचंड दम आहे. Garlic Ballad काही ठिकाणी अक्षरशः घुसमटवून टाकते. ह्याच लेखकाची Red Sorghum वाचायची आहे. 
काही वर्षांनी, अर्थव्यवस्था, सामरिक शक्ती ह्यासारखं चायनीज लेखक हे एक ग्लोबली impacting phenomenon बनणार अशीच लक्षणं आहेत. 

६. रघुराम राजन : आय डू व्हॉट आय डू (नॉन-फिक्शन) 
मी लिहिलेला सविस्तर रिव्ह्यू

७. शशी थरूर: Era of Darkness (नॉन-फिक्शन) 
यूट्यूब आणि सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या ऑक्सफर्ड येथील वादविवाद कार्यक्रमात 'ब्रिटीशांचे भारतावरील राज्य आहे भारताला हानिकारक होते आणि हे राज्य नसते तर आज आहे त्यापेक्षा भारत पुढे असता' अशी भूमिका शशी थरूर ह्यांनी मांडली होती. ह्याच भूमिकेला अधिक व्यवस्थित विषद करणारे पुस्तक 'Era of Darkness' आणि 'Inglorious Empire' अशा दोन नावांनी आलेले आहे. सविस्तर लिहावे असे पुस्तक. 

८. करण महाजन: Association of Small Bombs (फिक्शन, इंडियन इंग्लिश)  
लक्षात राहण्याजोगा प्रयत्न आहे. वाचावं असं.     

आजचे मरण उद्यावर ढकलले

  आजचे मरण उद्यावर ढकलले , तसे उद्याचे कलले किंचित परवावर , आणि परवाचे अंशतः तेरवावर टीचभर जागा झाली तिथे थोडे बूड टेकले खोल श्वास घे...