Skip to main content

Posts

Showing posts from March, 2016

बघ्या, होळी आणि आवाहनांना आलेले रंग

बघ्याचा एक मित्र बघ्याला सांगत होता, अरे, अनेक पंचांगकर्त्यांनी येऊन लोकांना आवाहन केलं आहे की प्रतीकात्मक होळी खेळा. केवळ टीळा लावा वगैरे. पुढे बघ्याच्या मित्राला आत्यंतिक धार्मिक आनंद झालेला की बघ आपला धर्म कसा युगानुकूल आहे वगैरे. बघ्याने आपल्या मित्राकडे नीट बघितलं आणि तो एकूणातच आपल्यापेक्षा च्युत्या आहे हे ठरवलं. मग तो दार्शनिक वगैरे अविर्भाव आणून म्हणाला की अरे युगानुकूल वगैरे नाही, तर केवळ ह्यावर्षी पाण्याची टंचाई असल्याने पैसे वाचवण्याचा हा गतानुगतिक मध्यममार्ग आहे. ह्यावर्षी मान्सून नीट होतो तर पुढच्यावर्षी छान सार्वजनिक होळी खेळली जाईल.        बघ्याने आपल्या मित्राकडे बघितलं तेव्हा त्यांच्यात एवढंतरी होतं का, चमत्कारावर लिहिलेला अग्रलेख गायब होण्याचा चमत्कार असे सगळे प्रश्न आपल्या मित्राच्या जिभेवर ओथंबलेले पाहून बघ्याने पळ काढला. आणि पळता पळता कुठल्याही सार्वजनिक चर्चेत आपले मत न नोंदवण्याचे मत अधिक ठाम केले.        पळत पळत आपल्या उपजीविकेच्या दैवताच्या नित्य नियमाच्या पाट्या किंवा प्रदक्षिणा उरकून बघ्या आपल्या बिळाकडे आला. तर तिथे लोकांचे घोळके २-३-४ च्या पुंजक्यात उभे असू…