Skip to main content

Posts

Showing posts from November, 2015

Borgen

(इथे मिळाले हे पोस्टर: http://i.jeded.com/i/borgen-first-season.4252.jpg)
Borgenहे डेन्मार्कची संसद जिथे आहे त्या इमारतीचे टोपणनाव आहे. आणि मी लिहितोय ते ह्याच नावाच्या डॅनिश टी.व्ही सिरीयलबद्दल. अर्थात तिचे तपशील तुम्हाला ह्या विकी लिंकवर मिळतीलच.       गेम ऑफ थ्रोन्स, हाउस ऑफ कार्ड्स हे सगळं बघून मी गुगलमध्ये सर्च केलं, ‘बेस्ट युरोपिअन टीव्ही सिरिज’. त्यात मला ‘बोर्जेन’ सापडली. पॉलिटिकल थ्रिलर असं ढोबळ वर्गीकरण करता येईल ह्या सिरीजचं. पंतप्रधान पदाची १ टर्म पूर्ण करणाऱ्या आणि अशक्य असा वाटणारे राजकीय पुनरागमन करून दाखवणाऱ्या ब्रीगीट निबोर्ग ह्या बाईची गोष्ट. आणि Sidse Babett Knudsenह्या अभिनेत्रीने ब्रीगीट निबोर्गची भूमिका केलेली आहे. किंबहुना तीच ह्या मालिकेचा लोकांच्या मनातला चेहरा आहे. (म्हणजे तुम्ही इंटरनेटवर पाहू गेलात तर!)       राजकीय सिरीज असताना तिची सास-बहु किंवा का रे दुरावा, तू तिथं मी न होऊ देणं आणि त्याचवेळी उगाच सनसनाटसुद्धा न आणणं असा बॅलन्स ह्या सिरीजने साधलेला आहे. हाउस ऑफ कार्ड्स बघताना जे एक चीप थ्रील जाणवत राहतं किंवा एक समकालीन भेळेचा प्रयत्न जाणवतो तो Borgen …