Skip to main content

Posts

Showing posts from July, 2015

द गोल्डफिंच

केव्हातरी आलेल्या सणकेत मी असं ठरवलं की इंडियन इंग्लिशच वाचायचं. कारण बाकीचं इंग्लिश आपल्याला परकं आहे. मार्खेज असेल किंवा बोलानो, शेवटी ते वास्तवाचे जे तुकडे जगले त्यांचा आपल्याशी ओढून ताणून संबंध आहे. थेट काही नाही. मुराकामी थोडा जवळचा असेल, पण शेवटी वेस्टर्न म्युझिक ऐकणारी आणि बीअर सिप करणारी त्याची रिअॅलिटी आपली नाही. आता असं ठरवण्याला काही अर्थ नाही. वाचन हे कसलीही ठाम युटिलिटी नसलेली गोष्ट आहे आणि तिच्याकडे एक कमी-जास्त तीव्रतेचे व्यसन म्हणून बघणे अधिक बरोबर आहे. पण असे निष्कर्ष फार काळ तग धरत नाहीत, आणि परत आपल्या कृतीत सामाजिक, वैयक्तिक अशी काहीतरी युटिलिटी मी शोधू लागतो. मग मी विचार करतो की कशाला वाचायचं? समजून घ्यायला!! काय चाललंय आपल्या आजूबाजूला ते समजून घ्यायला (हा!हा!!) त्यामुळे आपल्या आजूबाजूला असणाऱ्या माणसांच्या जातकुळीशी जुळणारी पुस्तकं मी वाचायला हवीत. मग मी इंडियन इंग्लिश नावाच्या ढिगात स्वतःला लिमिट ठेवायला बघतो.        ह्यांत काही चूक नाही असा कौन्सीलरी सल्ला मी माझाच मला देऊ शकतो. आणि अर्थात इंडियन इंग्लिशमध्ये काही खरोखर हिडन जेम्स आहेत. जसं ‘लिटनीज ऑफ डच बॅटरी’…