Skip to main content

Posts

Showing posts from June, 2015

किल्ला

दोन दिवसांत दोनदा बघितला मी पिक्चर. कशासाठी? चिन्मय आणि त्याचे मित्र ह्यांच्या सीन्स साठी, त्या सीन्सपाठच्या म्युझिकसाठी, आणि आपल्या मानेमागे हात ठेवून रेलून शब्द नसलेले क्षण आपल्या मनात निनादण्याचे, त्यांच्या येण्याने निर्माण होणाऱ्या बिंब-प्रतिबिंबाच्या साखळीचे सुख अनुभवण्यासाठी.        माझ्यासाठी काही हा नॉस्टॅल्जिया नाही. मी अशा शाळेत, अशा गावात कधीच नव्हतो. मला असे मित्रही कधी नव्हते आणि मी किंवा त्यांच्यातला कोणी बाकीच्यांना सोडून जाण्याबद्दल सुद्धा मला काही अनुभव नाही.        मला माझी शाळा आठवते तेव्हा काय आठवतं? स्पर्धा, अगदी तीव्र स्पर्धा, माझ्या मनातली, माझ्या पालकांच्या, आजूबाजूच्या मुलांच्या, त्यांच्या पालकांच्या, शिक्षकांच्या मनातली, त्यांच्या अॅम्बिशन्स. मग आठवते ती कळप म्हणून असण्याची क्रूरता. फुलपाखरू, गोगलगाय, चतुर, गांडूळ अशा आपल्यापेक्षा कःपदार्थ गोष्टींना संपवण्याची. आणि मग आपल्यातल्या दुबळ्या, नेभळ्या मित्रावर फोकस होणारी. मग सेक्स, थेट नाही, पण मनातला, सगळीकडे भरलेला.        पण मला त्याचं फार वैषम्य वाटत नाही. आणि असंही नाही की मी ती फेज एन्जॉय केलेली नाही. क्रिक…