Skip to main content

Posts

Showing posts from April, 2015

कोर्ट: विरोधाभासाचे अन्वयार्थ

‘कोर्ट’ सिनेमा आणि त्याच्या चित्रपट म्हणून असणाऱ्या बाबींचे विश्लेषण अनेकजण करत आहेत. मुळात फेसबुकवर ह्या सिनेमाची एवढी तगडी प्रसिद्धी झाली होती की मला मुळात कोणी पद्धतशीर हे तंत्र वापरत आहे की काय ह्याची शंका यायला लागली होती. अर्थात माझ्या बिनकामी हस्तीदंती मनोऱ्यामधली ही शंका आहे, आणि मुळात कुठल्याही गोष्टीकडे स्केप्टीकल होऊन बघण्याच्या सवयीचा हा नतीजा असावा. पण रिलीज व्हायच्या पहिल्याच दिवशी ‘कोर्ट’ बघावा असं मी ठरवलं होतं.        मला व्यक्तिशः ‘कोर्ट’ चित्रपट म्हणून आवडला असला तरी चित्रपटगृहात तो बघणं हा अत्यंत तापदायक अनुभव होता. आणि अनेकदा आजूबाजूच्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांनी आपण पाहतोय आणि ते पहातायेत त्या दोन वेगळ्याच तर गोष्टी नाहीत ना असं मला वाटत होतं, म्हणजे चित्रपट पाहताना आपली काही तंद्री वगैरे लागत नाही. आजूबाजूचे लोक हीच आपली फंडामेंटल कुतूहलाची बाब आहे. आणि चित्रपट तरी ह्या आजूबाजूच्या लोकांबाबत बोलतात म्हणूनच आपण बघतो.        ‘कोर्ट’ अत्यंत सटल अशी कलाकृती आहे. त्यात विरोधाभास आणि विसंगंती ह्यांचा वापर अत्यंत कौशल्याने केलेला आहे. तो टोकदार कटाक्ष टाकतो …