Skip to main content

Posts

Showing posts from June, 2013

तीन विश्वनाथ

यांतला पहिला तर तुम्हाला माहितीच आहे. मी त्याच्याबद्दल आधी लिहिलंय पण. तो आहे ‘रारंग ढांग’ मधला विश्वनाथ मेहेंदळे. दुसरा आहे मिलिंद बोकिलांच्या ‘अधिष्ठान’ कथे मधला विश्वनाथ. तिसरा आहे पानवलकरांच्या ‘परदुख शीतल’ कथेतला विश्वनाथ.       तिघेही थोडे जगावेगळे आहेत. मी या तिघांच्या गोष्टी वाचल्या त्या वेळा वेगवेगळया आहेत. ‘रारंग ढांग’ च्या विश्वनाथबद्दल फार लिहायला नको. ती कादंबरी, त्यातला मूल्यांचा झगडा, माणसांचे स्वभाव, निसर्ग हे सगळं तसं लोकप्रिय आहे.       दुसरा विश्वनाथ आहे तो बोकिलांच्या ‘झेन गार्डन’ कथासंग्रहातल्या ‘अधिष्ठान’ कथेत. मी जेव्हा ती गोष्ट वाचली, त्या वेळच्या माझ्या मनस्थिती आणि परिस्थितीमुळे म्हणा मला ती गोष्ट आवडली. पहिल्या विश्वनाथसारखा हा दुसराही तेज आहे. फरक एवढाच की मेहेंदळे सारा रोमान्स पत्रांतून करायचे. ह्या दुसऱ्या विश्वनाथचं लग्न झालंय, आणि त्यानंतर बायकोला सोडून तो पुढच्या शिक्षणाला अमेरिकेत का परदेशात गेलाय.       तिसरा विश्वनाथ आहे तो नैतिकतेच्या बाबतीत पहिल्या दोघांच्याही खाली आहे. त्याचं लग्न झालंय, त्याचे अजून एका स्त्रीशी सबंध आहेत, आणि त्याची नोकरीही जायच…