Skip to main content

Posts

Showing posts from May, 2013

च्युXX कथा-२ : विक्रम वेताळ -१

इशारा: प्रस्तुत ब्लॉगपोस्ट ही ब्लॉग लिहिणाऱ्याच्या मनोरंजासाठी आहे. त्यात अन्य कोणाच्या मनोरंजनाचाही हेतू खरंतर नाही. तसे झाल्यास तो केवळ योगायोग समजावा. तसेच सामाजिक संदेश, सामाजिक विधायक बदल, राष्ट्रनिर्मिती, संस्कार असा कुठलाही साईड इफेक्ट साधण्याचाही ह्या लिखाणाचा हेतू नाही. ब्लॉगरच्या क्षुद्र अस्तित्वापलीकडे हे सर्व आहे.
         तर महिना अखेरच्या शुक्रवारच्या रात्री, एका आय.ची. कंपनीत काम करणारा विक्रम सिग्नेचरचे २.५ पेग टाकून त्याच्या झुणे शहरातील प्राचीन घराकडे जाऊ लागला होता. खरेतर पिवळ्या प्रकाशाने लगडलेला रस्ता सोडून तो ह्या आड रस्त्याला आला कशाला?  आणि तेही केवळ आजच्या या शुक्रवारी नाही. मागचे सहा महिने, दर मंथएंडला येणाऱ्या विकेंडला विक्रम या आड रस्त्याला येतो. त्याला  त्याचे प्रोजेक्ट आठवत नाही, त्याला त्याच्या बाबांची औषधे आणि अपॉइंटमेंट आठवत नाही. कंपनीतून बाहेर पडला की तो थेट  एक निप, शेंगदाणे आणि त्या नंतर एक रँडमली सिलेक्टेड सब्जी आणि दोन रोटी अशा नेमस्तपणे पितो. किंबहुना ही त्याची त्याच्या ऐतिहासिक, सामाजिक, वैयक्तिक अशा साऱ्या च्युत्याप्यापासूनची एक्झिट असल्यागत तो…