Skip to main content

Posts

Showing posts from September, 2011

त्याच्या बिन अर्थाच्या, निष्पाप निरागस आठवणी

बाई सावकाश चालत त्यांच्या बिल्डींगपाशी पोचल्या. त्यांचे घर तळ-मजल्यावरच होते. समोर ४ पायर्या आणि त्या चढून डावीकडे गेलं कि त्यांचं घर. त्या पायर्या चढण्या अगोदर बाई थांबल्या. त्यांनी एकदा बिल्डींगकडे बघितलं. 'आनंदी' आणि खाली १९७८. ३ मजल्यांची इमारत. आणि इमारतीच्या चारी बाजूला मोकळी जागा. मग त्यांनी एकदम त्या आजूबाजूच्या जागेकडे पाहिलं. थोडं पुढे विटा मांडून मुलं क्रिकेट खेळत होती. आणि बाकी मिळेल तिथे चारचाकी-दुचाकी गाड्या उभ्या होत्या. कोणती गाडी कोणाची हेही त्यांना लक्षात येत नव्हतं. आधी सामंतांची पांढरी गाडी, अम्बसीडर का पद्मिनी अशी काही तरी असायची. आणि तीही ते अनेकदा धक्के मारून चालू करायचे. आणि २-३ जणाच्या बजाज स्कूटर. आता कदाचित प्रत्येक घरटी एक तरी चारचाकी किंवा दुचाकी आहेच.    तेवढ्यात वरच्या मजल्यावरून एक मुलगा, २८-३० चा तरुण हातात किल्ली फिरवत उतरत आला. हा इथे राहतो का कोणाकडे आलाय.... बाईना सहज पार करून तो आपल्या दुचाकीशी गेला. मग त्याने ती नीट वळवून घेतली. मग एका झटक्यात पायाने किक मारून गाडी चालू करून तो निघून गेला.     बाईनी, अगदी अपोआप, मनात मोजले, सुहास असता त…