Skip to main content

Posts

Showing posts from July, 2011

झोळी घेतलेला आणि खोल डोळ्यांचा माणूस

समोरचे लोक मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते. एक डोळ्यात खोल गेलेली वेडाची झाक असणारा माणूस त्यांना काहीतरी सांगत होता. समोरची माणसे जणू त्याच्या शब्दांच्या दोऱ्या  वापरून कुठल्यातरी दूरच्या गावात पोचली होती. त्यांचे कान त्या माणसाचे शब्द टिपत होते आणि त्या शब्दांमधून व्यक्त होणारे अस्पष्ट, अधिरे स्वप्न त्यांच्या डोळ्यात उमटत जात होते. प्रत्येकाला ऐकू जाणारे शब्द जरी सारखे असले तरी अर्थाच्या अनिर्बंध कुंचल्यानी प्रत्येकाच्या डोळ्यासमोर नाचणाऱ्या चित्राचे रंग मात्र वेगवेगळे होते. आणि हे चित्र बाकीच्या चित्रांसारखे खुणावणारे, बोलावणारे आणि नंतर परके करून सोडणारे नव्हते. त्यात प्रत्येकाची हक्काची, ओळखीची जागा होती.  आपल्याला एका सुंदर जगात जगायचे आहे. आपण श्रीमंत असू का गरीब ह्यापेक्षा आपण जिथे राहणार असू तिथे काही एक रचना, काही एक विचार आणि सुंदरतेची अनुभूती आहे का हे महत्वाचे आहे. अशा रचनेत केलेल्या परीश्रमाना अर्थ आहे. आज आपण उन्दरांसारखे पळतो, गलेलठ्ठ होतो, आपापली बिळे सजवतो आणि त्या नादात सारे पोखरत जातो. एक ना एक दिवस हा पोकळ डोलारा कोसळणार आहे. आणि आपण सारे सुस्त, गुबगुबीत उंदीर त्या पडझड…