Skip to main content

Posts

Showing posts from August, 2010

मरायचं हेच वय...

काल एका मित्राची आई गेली. मग मेल्या माणसानंतर उरणारे हम्बरडे, रडून रडून लालसर डोळे, दाबून ठेवलेले हुंदके, पाठीवर फिरणारे धीराचे सोयीस्कर हात. गेलेला माणूस ज्यांचा थेट आतड्याचा कोणीच नवता त्यांची पुढच्या तयारीची धावाधाव. मरणाची फिरवून फिरवून सांगितली जाणारी गोष्ट, मध्येच आई गेली ह्या जाणीवेने कोसळणारा मित्र, त्याच्या पुढ्यातला त्याच्या ६० वर्षे वयाच्या आईचे प्रेत, नाका-तोंडात कापूस, अंगावर चादर. निलगिरीचा वास, खाली मान घालून बसलेले नातेवाईक, 'आजी अशी का झोपलीये, मला कडेवर का घेत नाही' असं म्हणणारी ४ वर्षे वयाची नात, तिला दिली जाणारी तेवढीच बालिश स्पष्टीकरणे, आणि मग तिचं सगळ्यांनी मिळून टाळलेला प्रश्न, 'ती मेली म्हणजे'? ' .... कोणालाच माहित नाही, अर्धा आयुष्य स्वयंपाक घरात राबलेली, मग हृदयातला कळा होईल तेवढा वेळ आपल्याच काळजात ठेवलेली, आणि मग मेलेली त्याची आई, ती मेली म्हणजे काय? कोणाची आई, कोणाची बायको, कोणाची आजी, कोणाची बहिण, सगळी नाती 'आहे' मधून 'होत्यात' जाणे. आठवणींचा हळूहळू धूसर होत जाणारा ढीग ह्यात नवीन भर पडणार नाही.... हे सगळे 'साईड…