Saturday, January 9, 2010

शहर उजळून निघता समृद्धीच्या दिवांच्या वैभवी प्रकाशात
आनंदाचे रंग अवघा आसमंत भरून टाकतात
दुख नावाचा शब्दही उमटत नसताना
एक म्हातारा, असलेला एकुलता एक पाय आणि त्याच्या जोडीची कुबडी
हातात घेवून चालत असतो रात्रीच्या जेवणाचे जिन्नस
उत्साहाच्या उर्जेने वाहत्या रस्त्यात त्याची चाल
कोणाच्या खिजगणतीत नाही
घरी असेल त्याच्या खचलेपण तोलणारी पिचलेली बायको
का अपंग आयुष्याला झाकणारा एकटा अंधार?
पणती तरी ठेवली असेल का त्याने
आशाहीन भविष्यापुढे उमेदीचा अंकुर म्हणून?
अंधाराच्या मुळांवर तोललेला
प्रकाशाचा डोलारा
देखण्या मंदिरातला
वांझोटा गाभारा

हरवलेल्या हिवाळ्याच्या कविता

उंबऱ्याशी आलेल्या दुःखाच्या घिरट्या आहेत शहरावर. खरंतर हा डिसेंबर आहे , जिथे आपण वर्षभराचे घाव हलक्या सुखाच्या रंगीन मृगजळात विसरू शक...