Saturday, December 19, 2009

आवडलेल्या कविता

अखेरच्या वळणावर यावा
मंद सुगंधी असा फुलोरा
थकले पाउल सहज उठावे
आणि सरावा प्रवास सारा
-आरती प्रभू

मी विझल्यावर त्या राखेवर नित्याच्या जनरीतीप्रमाणे
विस्मरणाची थंड काजळी उरेल थडगे केविलवाणे
मी विझल्यावर त्या राखेवर पण कोर्या अवसेच्या रात्री
धुळीत विखुरल्या कविता माझ्या धरतील चन्द्रफुलांची छत्री
-बोरकर

आजचे मरण उद्यावर ढकलले

  आजचे मरण उद्यावर ढकलले , तसे उद्याचे कलले किंचित परवावर , आणि परवाचे अंशतः तेरवावर टीचभर जागा झाली तिथे थोडे बूड टेकले खोल श्वास घे...