Skip to main content

Posts

Showing posts from May, 2015

गोवा

आणि मग मी कवितेत तुझी वाट बघतो, माझ्या इमॅजिनेशनची शेवाळी जमलेल्या झोपाळू रस्त्यावरून तू निवांत चालत ये.. तू थांबवून ठेव ह्या अस्ताव्यास्त शहराचं वार्धक्य आणि ताज्या ताज्या जन्मांचे निर्माल्य ठेवत जा पावला-पावलाखाली तू कुठल्याही दिशेला बघ, तुला दिसेल तिथे उपभोगाची तृप्त ढेकर, त्या सुस्त सुखाच्या चरबीला जाळ, जाळ इतकी जाळ की मला तुलाच हाडा-मासाने पचवून जावं एवढी तुझी भूक लागेल, मग मी तुझी कवितेत वाट बघतो.. तू माझ्या डिझायरचे दोर काप, तू मला जीर्ण-शीर्ण म्हातारा कर. तू मला नाचव मरणाच्या भिकेत टाहो फोडत आणि बघ तरी माझ्या त्वचेत किती उरेल तुझ्या प्राप्याचा अनावर दाह मग मी तुझी कवितेत वाट बघतो.. तू मला झिंगून ठेव, माझा मेंदू आंबवून ठेव, तू मला तसू तसू करून चीलीमित भर, तू मला सोड थेट रक्तातून मेंदूच्या कॉन्शसमध्ये नशेच्या अवाढव्य जाळ्यात तू मला लाव सापळा म्हणून आणि बघ होते शिकार कोणा-कोणची, मग मी तुझी कवितेत वाट बघतो तू हे सगळे दिवस लाव एकावर एक थेट आणि रात्रीच्या कोरीव भुवयांना रंगवून ठेव तू टाक घामट वाऱ्याच्या झ॒ळकिंचे कटाक्ष तू देहाचा लोलक झुलवत ठेव मग मी तुझी कवितेत वाट बघतो.. तू माझे शब्द शोषत…

नगरकरांची दोन पुस्तके

मागच्या महिन्याभरात मी नगरकरांची ‘सात सक्कं त्रेचाळीस’ आणि ‘एडी अँड रावण’* वाचली. ‘सात सक्कं ..’ तशी माझ्यासाठी बरीच अवेटेड होती. ‘एडी अँड रावण’ वाचायचं खरं कारण म्हणजे ‘सात सक्कं..’ नंतर हा लेखक आता इंग्लिशमध्ये कसा लिहितो आणि काय लिहितो ह्याचं कुतूहल. म्हणजे दोन भाषांत लिहू शकणाऱ्या लेखकाबद्दल आणि त्याबद्दल रेकग्निशन मिळवू शकणाऱ्या माणसाबद्दल प्रश्न पडणारच. म्हणजे दोन भाषा लिहिताना मुळात एकसंध असं काही आहे का दोन्ही भाषांत सापडणारा लेखक हि दोन निरनिराळी माणसं आहेत असा प्रश्न.       ‘सात सक्कं..’ वाचताना आपण कोसलाच्या सावलीत पण वेगळ्या उजेडाच्या छायेत आहोत असं मला सारखं वाटत होतं. दोन्हीत त्यांच्या त्यांच्या पोताचा डार्क ह्युमर आहे. दोन्हीत आपल्या आजूबाजूच्या स्पेस-टाईमचं थंडगार, निर्विकार होऊ घातलेलं पण शेवटाला दुखावलेलं निरीक्षण आहे. निरीक्षणाचा हा थंडगारपणा कोडगा किंवा भयप्रद नाही. पण आपल्या कृती, भावना, नाती, वेदना ह्या सगळ्यांच्या असण्यापाठी शोधू गेलं तर जाणवणाऱ्या आणि आपला कबजा घेणाऱ्या निरर्थकतेच्या ओढीशी जोडलेला निरीक्षणाचा नजरिया आहे. पण तरीही ‘कोसला’ किंवा ‘सात सक्कं..…