Skip to main content

Posts

Showing posts from December, 2014

वूल्फ टोटेम

टोटेम शब्द मी ऐकला तो नोलानच्या ‘इंसेप्शन’ मध्ये. वूल्फ टोटेम बद्दल मी वाचलं ते मॅन एशिया पुरस्काराच्या यादीत. वूल्फ टोटेमला २००७ चा मॅन एशिया पुरस्कार मिळाला होता. अर्थात भारताच्या बाहेरच्या भूगोलावर असलेली कादंबरी वाचताना मी थोडा साशंक असतोच. कारण माझ्या आत डोळे मिचाकावाणाऱ्या प्रश्नार्थक क्रिटिकला लागणारी फारशी माहिती माझ्याकडे नसते. आणि चांगल्या स्टोरी-टेलरने आपल्याला गुंगवून टाकणं हे मला ‘सॉंग ऑफ आईस अँड फायर’ साठी आवडत असलं तरी वास्तवाने प्रेरित फिक्शनसाठी नाही. मी फिक्शन वाचतो कारण जगातील माणसे कशी वागतात हे मला बघायचं असतं आणि त्यामुळे फिक्शन मला जे सांगतीये त्याबद्दल थोडं फार काही ठाऊक असेल तर क्रिटिकचा तळीराम थोडा शांत राहतो.       पण वूल्फ टोटेम काय आहे हे सांगणारा जाहिरातवजा मजकूर वाचताना त्यात मंगोलिया नावाचा भाग असणार आहे, वूल्फ असणार आहेत आणि प्रदीर्घ आणि खोलवर थंड हिवाळे असणार आहेत आणि कादंबरी जवळपास ८०० पानांची आहे ह्या सगळ्या घटकांनी मी ती विकत घेतली. वूल्फ, हिवाळे आणि लांबलचक कादंबरी ह्याची चटक मला ‘सॉंग ऑफ आईस अँड फायर’ वाचताना लागली. सो अशा नशिल्या आनंदाचा अन…