Skip to main content

Posts

Showing posts from November, 2013

माझाही श्रद्धांजलीपर लेख

सचिन तेंडूलकर निवृत्त होणार ह्या गोष्टीचा गवगवा फेसबुक, वृत्तपत्र असा सगळीकडे चालू आहे. आणि त्यात लिहिणारे देश, करोडो लोक हा शब्द इतक्या सहजी वापरतात की काहीवेळा मला वाटतं की खरंच गोष्टी इतक्या मोठया स्केलच्या असतात का? मला असा कुठलाही डावा किंवा उजवा आक्रोश करायचा नाही की काय हा गाढव देश, एवढ्या समस्या किंवा इतर अभिमानास्पद गोष्टी असताना ह्या एका कॉलोनियल खेळाचे, त्यात खेळून गब्रू झालेल्या एक खेळाडूचे गुणगान करत बसतात. माझा प्रश्न एक कुतूहल आहे, की आत्ता ह्या वेळेला (काही मिनिटांपूर्वी तो देवनारायणच्या बॉलिंगवर आउट झाला आहे) किती लोक त्याची बॅटिंग पहात बसले असतील? म्हणजे वानखेडेवर साधारण ५०००० असतील. २०११ च्या जनगणनेनुसार भारतात जवळपास २५ करोड घरे आहेत. त्यात सुमारे ४८% लोकांकडे ती.व्ही आहेत. म्हणजे जवळपास १२ करोड टी.व्ही. झाले. त्यातले किती करोड आत्ता चालू असतील? मी माझ्या जवळच्या १२ किंवा १२० घरांना पाहिलं तर साधारण ५-६ टक्के प्रमाण असावं, म्हणजे ६० लाख लोक टी.व्ही वर बघत असतील आणि साधारणपणे ऑन अॅव्हरेज एक माणूस तो टी.व्ही. बघत असेल. परत ह्यात शेतकरी किती असतील, दैनदिन मजुरी करणारे…