Skip to main content

Posts

Showing posts from October, 2011

एक एक्स संध्याकाळ

शुक्रवार संध्याकाळ. ऑफीसमधले बरेच जण लवकर निघाले होते. त्याने घड्याळाकडे पाहिले. ६.३० वाजले होते. त्याने समोरच्या कम्प्युटरची स्क्रीन बंद केली. गाण्यांचा आवाजही एकदम कमी केला. आणि हात डोक्यामागे बांधून खुर्चीतच तो मागे झुकला. पुढच्या एका तासात, उद्या-परवाच्या दोन सुट्ट्यांत, मग येणार्‍या अटळ नव्या आठवड्यात काय करायचे ह्यासाठीचे काहीही त्याच्या डोक्यात येत नव्हते. एखादा ट्रेक वगैरे ठरवायला हवा होता. पण लगेच त्याला जाणवलं की त्याला अशी शांतता वगैरे काही नकोय. त्याला असे ठरवायचेच नाहीये काय हवेय ते, फक्त जे हवे आहे ते घडत जावे. एकदम तो जरा मागे जास्त झुकला अन त्याच्या मानेला झटका बसत तो जागा झाला. त्याने एक मोठी जांभई दिली. तो खुर्चीतून उठला. बेसिनपाशी त्याने तोंडावर थोडे पाणी मारले. चेहर्‍यावरून रुमाल फिरवला. आणि ए.सी.च्या थंड हवेत हळूहळू सुकत जाणारा चेहर्‍यावरचा ओलावा घेऊन तो कॉफी मशीनपाशी आला. एक कप नोझलखाली ठेवून त्याने कॉफीचे बटण दाबले. तोच नेहमीचा झर-सर आवाज करत दाट चॉकलेटी रंगाची कॉफी कपात आली. त्याने कपाला हात लावला. कोमट कॉफी. त्याने झटझट दोन-तीन घोट घेतले. आणि मग उरलेला कप तसाच…