Sunday, February 17, 2008

कधीही, कुठेहि
पापण्या जडावतात
डोळे लालसर होतात
अन् तुटत जातो मी जगापासून
पण सांगता येत नाही
मी झोपतो का जागा असतो.
कुठेतरी अस्पष्ट धागे जुळतात्
मी वेगळ्या जगात जगायला लागतो
अन् तोच परत उतरतो या एका डुनियेत
मागच्या बुजलेल्या आठवनी, अधुरी स्wअप्ने, भ्रम, विभ्रम, माणसं, चांगली, वाइट या सगळ्यांचा एक केलिडोस्कोप
क्षणात रंगीबेरंगी झगमग,
दुंड दूसर स्तलकालविरहित होतं सारं.
पण त्यानंतर जाणवतं एक भयाण रिकामपण,
आपली प्रवाहपतित असहय्यता आणि सोबत भणाणणारं डोकं.
सतत वाहती जखम घेटल्यासारखा मी वावरतो या जगात, इमाने इतबारे, अन् जगतो कुठे मलाच थाउक नाही.

कदीतरी मी या डुनियेला अनोळखी होइन.
माझं इकटं सर्वव्यापी डुःख आणि मी शांतपणे गुजगोष्टी करू.
अन् मग मी शांतपणे डोळे मिटेन
माझ्य एकमेव शांत झोपेसठी,
या जगात बहुतेक त्याला मरण म्हणतात.

वाचलेले-पाहिलेले काही

वाचलेले  १. एम. जे. अकबर ह्यांचे 'Kashmir: Behind the Vale'.  इस्लामच्या माझ्या आकलनाची सुरुवात हे अकबर ह्यांच्या 'Shade of S...