Sunday, June 3, 2007

पावसाचे दिवस

दुपार सम्पते आणि
निवत आलेल्या उन्हापाठोपाठ
ढगाळून जाते आकाश
पावसाचे नवे थेम्ब
येतात सावकाश

ओलेकच्च डाम्बरी रस्ते
चुकार तापल्या मातीचा सुवास
सिमेन्टच्या या शहराला सुध्दा
का लागते पावसाची आस

सारेच रन्ग नव्याने रन्गतात
आभाळाचा रन्ग घेउन
ऊन निसटते अलगद
ढगाला सोनेरी कड देउन

तर एक् असे कर
मिटून जाइल ही सन्ध्याकाल
आठवणीची पाने लिहून ठेव
तुJह्या तहानलेल्या काळजाचा पत्ता
नव्या पावसाला देउन ठेव

आजचे मरण उद्यावर ढकलले

  आजचे मरण उद्यावर ढकलले , तसे उद्याचे कलले किंचित परवावर , आणि परवाचे अंशतः तेरवावर टीचभर जागा झाली तिथे थोडे बूड टेकले खोल श्वास घे...