Skip to main content

Posts

Showing posts from February, 2014

शिळी कढी आणि रिकामचोट टाहो

टाहो फोडणं हा आपला आवडीचा उद्योग आहे, किंबहुना जन्मजात जोपासलेली सवय. आणि एकाने फोडला की त्याला जोड देणारे टाहो किंवा त्याचा कसा फोल असा टाहो फोडणं हा पण. आणि असे टाहो फोडून जीव सुकला की त्याला अभिमान किंवा तत्सम थोर गोष्टींची कलमे लावणे. तर अशा आपल्या रुढीला अनुसरून आपण आज मराठी भाषेविषयी टाहो फोडूया आणि सरतेशेवटी अभिमान वगैरे व्यक्त करून आपापल्या वाटेला लागुया.        तर काल रात्री मराठी भाषा माझ्या स्वप्नात आली. मी उशाशी किंडल ठेवून झोपतो. आणि त्यात एक इंग्लिश पुस्तक वाचत झोपलो होतो. तिने आधी मला थोबाडीत मारली आणि मग तिने टाहो फोडला. सकाळी उठून पाहतो तर ह्या दृष्टान्ताशी जुळणारे काही पेपरात, फेसबूकात.          मग तर मी अख्खा थरकापलो. म्हणजे एवढं आध्यात्मिक वगैरे पोटेन्शिअल असलेली भाषा आणि ती अशी दुःखी. अरं, रं, रं. आणि का तर म्हणे ती मृतप्राय होत आहे, इंग्लिश का इंग्रजी का आंग्ल भाषा तिच्यावर चहू बाजूने आक्रमण करून राहिली. लहान-लहान मुले इंग्रजी माध्यमात जाऊन राहिली. आणि ही लहान मुले पुढे मराठी कशी बोलतील ह्या विवंचनेने ही भाषा आज मरू लागली. टाहो, टाहो, थोर टाहो.        छोट्या…

दगड कुठे लागला?

हा प्रकार एंटरटेनमेन्टसाठी नाहीच. हा खूप सिरीयस अटेम्प्ट आहे एका भयंकर गोष्टीविषयी सांगायचा. अशा बाळबोध शब्दांत बोलाण्यावाचून आपली ‘जात’ या प्रकारातल्या कुठल्याही एक्स्प्रेशनबद्द्दल बोलायची औकात आहे माझी असं मला वाटत नाही.        पण दिग्दर्शकाने शेवटला भिरकावलेला दगड नेमका कोणालाच न लागता एका कोरड्या बनू लागलेल्या होलमध्ये पडून राहील का काय असं वाटतं. असलं भरताड काही वाटण्याची संधी दिल्याबद्दल खरंतर माझ्या सहप्रेक्षकांचा मी आभारी आहे.        माझ्या शेजारी तीन मित्र सिनेमा बघायला बसले होते. त्यातले माझ्या बाजूचे गुटखा खाऊन बसल्या सीटसमोर थुंकत होते. मी एकदा त्यांच्याकडे पाहिल्यावर त्यांनी मला टाळी मागायला हात पुढे केला. त्यांच्या बाजूला सिनेमाचा रिअल टाइम आणि लाउड समीक्षक बसला होता. आणि त्याच्या बाजूला ह्या तिघांमधला जास्तीत जास्त इम्बरेस झालेला मित्र.        पिक्चर सुरू झाल्यापासून ५व्या मिनिटाला समीक्षक सुरू झाले. गुटखापंत त्यांची री ओढू लागले. ते दोघे अनावर झाले की तिसरा त्यांना थोडा हटकायचा. प्रत्येक समीक्षेच्या आधी आई किंवा बहिण किंवा शरीराचे अवयव ह्यांची याद स्मरून समीक्षा केली जा…

झलकतो चंद्र

झलकतो चंद्र हायवेवरच्या विदीर्ण आकाशात आणि रस्तावरचे कुत्रे भुंकतात सरावाच्या असूयेने मालकाच्या लोभसवाण्या पुष्ट कुत्र्यांकडे पहात
आपला आत्मा तसू तसू वाटला आहे असा या भटक्या किंवा बांधलेल्या कुत्र्यांत, निमिषार्धात गायब होणाऱ्या स्वार्थी हरहुन्नरी मांजरांत आणि उशिरा रस्त्यावर असणाऱ्या भरधाव निवांत गाड्यांत आणि तरीही राहत फतेह आली खान म्हणतो ‘साजिश मे सामील सारा जहॉं है’
एका क्वार्टरला एवढी अनुभूती खंबा मारतो तर ह्या कुत्र्यांसोबत मीही भिडवली असती माझी हाक   निऑन दिव्यांच्या या भासमान अवकाशात
कॅपिटलिस्ट दिवसाने चिणलेली टीचभर रात्र देते घाबरट ढेकर त्या वेळेला ह्या रस्त्यांच्या कडेने कुसा बदलतात कामोत्सुक जीव, कोरी करकरीत बालके आणि रिकामे वृद्ध आणि तरीही जाते वेळ सरकत सगळ्यांवर आपली चिंधी फिरवत गतानुगतिक फिलोसॉफर तेव्हा उसासा देतो   इन द लोंग रन वी ऑल आर डेड  

आयडेन्टिटी फेटीश आणि निखळ च्युत्यापा

तुम्हाला निखळ च्युत्यापा अनुभवायचा असेल, वेगवेगळया स्टिरीओटाइप्सची ठिगळे कशीही एकमेकांना जोडून सुमारे अडीच तास चालणारा अडाणचोट प्रकार बघायचा असेल तर पुणे व्हाया बिहार बघा.        आता म्हणाला की असं आहे बाबा अति शहाण्या माणसा, तर तू काय तिथे XXवत बसला होतास! आता असं आहे की आपल्याला वेगवेगळे च्युत्यापे समजून घ्यायची स्वाभाविक आवड आहे. आणि जसे एक थोर लेखक म्हणाले त्या धर्तीवर, सारी शहाणी माणसे एकसारखी वागतात, च्युत्ये आपापल्या परीने निरनिराळे च्युत्यापे करीत असतात ह्या बंधुप्रद भावनेने मी तिथे होतो.        बाकी तुम्हाला आयडेन्टिटी फेटीशबद्दल कुतूहल असेल, म्हणजे तुम्हाला सटल असं काही वाचून भरसट होण्याइतका वेळ असेल तर तुम्ही अमर्त्य सेन ह्यांचं ‘आयडेन्टिटी अॅन्ड व्हायलन्स’ वाचू शकता. आणि इतका वेळ किंवा भरसटलेपण तुम्हाला नसेल किवा वरील पुस्तक वाचून तुम्हाला वेळ वाया गेला असंच वाटत असेल तर तुम्ही वेडे आहात किंवा तुम्हालाच आयडेन्टिटी फेटीश आहे. फेटीश अशा अर्थाने की स्वतःला कुठल्या ना कुठल्या आयडेंटिटी मध्ये पहिल्याशिवाय तुम्ही जगूच शकत नाही. आणि त्यामुळे तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्…

अ रेनी (किंवा कुठलाही चालेल) असा डे

पुढे स्पॉईलर्स आहेत, नाविन्य जाऊन ओबडधोबड तात्विक वाटण्याचे नको असेल तर काळजी घ्यावी.
       एका शहरात आपली ठरलेली कामे संपवताना मधला रिकामा वेळ उगाच भरसटून न जाता काढण्याचा उपाव म्हणून मी थेटरात पोचलो. ७० रुपयात चित्रपट, तोही चांगल्या प्रतीच्या स्क्रीनवर ही मुंबईत माझ्यासाठी  गतवैभवाची किंवा कधीच नसलेल्या अद्भूताची (सकाळचे राखीव शो सोडून) बात आहे. तर अशा सर्व प्रस्तावानेनिशी स्क्रीनवर पाऊस पडू लागला आणि मला असे वाटले की मी गोवा-५३ नावाचा चित्रपट पाहतो आहे की काय! मराठी बोलणाऱ्याच्या विचारातून पुणे उणे होत नाही ते असेच बहुदा.        तर एक जे हवे ते कसेही करून मिळवणारा, साधनशुचिता वगैरे नसलेला आणि ‘यश’ हेच काय ते एकमेव ध्येय मानणारा पुरुष आणि त्याची पत्नी ह्यांची गोष्ट. ती पावसाळ्यात, उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यातही घडू शकते अशी. गोष्टीची एकदम दमदार बाजू म्हणजे तिच्यात केलेला परा-मानस किंवा सुपर-कॉन्शस म्हणता येईल अशा स्टोरी-टेलिंगचा वापर. मायबाप जागतिक सिनेमाच्या आपल्या सूक्ष्म अनुभवात ‘डेव्हिल्स अॅडव्होकेट’ मध्ये ह्याच्याशी साधर्म्य असलेल्या तंत्राचा वापर केलेला आहे. आणि आपल्या परसदारी अ…